घरमहाराष्ट्रनाशिकसिनेटवर ‘मविप्र’चा डंका; संस्थेतील १९ सदस्यांचा विजय

सिनेटवर ‘मविप्र’चा डंका; संस्थेतील १९ सदस्यांचा विजय

Subscribe

नाशिक : शैक्षणिक क्षेत्रात 108 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) निवडणुकीतही नेत्रदीपक यश मिळवले आहे. पुणे विद्यापीठाच्या पदवीधर, प्राचार्य, अध्यापक व विविध विषय अभ्यास मंडळाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात मविप्र संस्थेचे प्राचार्य गटातून व अध्यापक गटातून सिनेटवर प्रत्येकी एक व विविध विषय अभ्यास मंडळांमधून एकूण 17 सदस्य विजयी झाले आहेत.

सिनेट या विद्यापीठाच्या अत्यंत महत्वाच्या अधिकार मंडळावर प्राचार्य गटातून एस. व्ही. के. टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे व अध्यापक गटातून संस्थेच्या कर्मवीर गणपतदादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निफाड येथील प्रा. डॉ. चिंतामण निगळे हे एसटी प्रवर्गातून सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. तसेच सामाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख हे समाजकार्य अभ्यासमंडळातून व वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळातून संस्थेचे डॉ. दर्शन कोकाटे, संगणकशास्र विषय अभ्यासमंडळातून डॉ. मधुकर शेलार, भूगोल विषय अभ्यासमंडळातून डॉ. ज्ञानेश्वर पवार, सूक्ष्मजीवशास्त्र विषय अभ्यासमंडळातून डॉ. अविनाश काळे, संख्याशास्त्र अभ्यासमंडळातून डॉ. गणेश फड, मराठी विषय अभ्यासमंडळातून डॉ. सुरेश जाधव, इंग्रजी विषय अभ्यासमंडळातून डॉ. शरद बिन्नोर, राज्यशास्र विषय अभ्यासमंडळातून डॉ. संजय मराठे, मानसशास्र विषय अभ्यासमंडळातून प्राचार्य डॉ. पुंडलिक रसाळ, संरक्षण व सामरिकशास्र विषय अभ्यासमंडळातून डॉ. राजेंद्र पवार, समाजशास्र विषय अभ्यासमंडळातून डॉ. संजय सावळे, बिझनेस प्रॅक्टिस अभ्यासमंडळातून डॉ. वसंत बोरस्ते, अकौन्टन्सी विषय अभ्यासमंडळातून डॉ. साहेबराव मोरे, मार्केटिंग अभ्यासमंडळावर डॉ. सुजाता गडाख, शिक्षण मानसशास्र अभ्यासमंडळातून डॉ. विद्या जाधव, प्रोडक्शन व ऑपरेशन मॅनेजमेंट अभ्यासमंडळातून डॉ. दीपक खैरनार विजयी झाले.

- Advertisement -

सिनेटसह विविध गटांमध्ये विजयी झालेल्या सर्व प्राध्यापकांचे संस्थेच्या वतिने अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. अजित मोरे, डॉ. डी. डी. लोखंडे उपस्थित होते. संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी नवनियुक्त सदस्यांचा सत्कार केला व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,कौशल्य आधारित अभ्यासक्रम व संशोधन यामध्ये विद्यार्थी केंद्रित व गुणवत्ता वाढीस उच्चतम दर्जाचे आपापल्या विषयातील अभ्यासक्रम करण्याबाबत मार्गदर्शन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -