घरताज्या घडामोडीकुख्यात गुन्हेगार बाबा शेख खूनप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

कुख्यात गुन्हेगार बाबा शेख खूनप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

Subscribe

कुख्यात गुन्हेगार बाबा शेख खूनप्रकरणी संशयित दोनजणांना नाशिक पोलिसांनी बुधवारी (दि.२३) जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अमीर ऊर्फ समीर समीम खान ऊर्फ मुर्गीराजा (३०, रा. एकलहरा रोड, नाशिक) अर्जुन सुरेश पिवाल (३०, रा. शिवपार्क सोसायटी, जेलरोड, नाशिक) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

डझनभर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार बाबा शेखचा शनिवारी रात्री टोळीयुद्धातून नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगरमध्ये दोन जणांनी पाठीत पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. बाबा शेखने मृत्यूपूर्वी दोन संशयितांची नावे घेतल्यामुळे पोलिसांना तपासाला दिशा मिळाली. या गुन्ह्यातील संशयित समीर खान ऊर्फ मुर्गीराजा धुळे येथील व्दारका लॉजमध्ये असल्याची माहिती इन्ट्रॉगेशन टेक्निकच्या वापरात पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील कारवाईकरिता नाशिक पोलिसांकडे सुपूर्द केले. दुसरा संशयित अर्जुन सुरेश पिवाल गंगापूर परिसरातील सुलावाईनरी येथे असल्याची पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसांना आज दोघांना नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -