घरमहाराष्ट्रनाशिकडाळिंब व्यापार्‍यास लुटणारी टोळी जेरबंद

डाळिंब व्यापार्‍यास लुटणारी टोळी जेरबंद

Subscribe

शहर पोलिसांनी तिघांना सापळा रचून केली अटक ; ७५ लाख रुपये जप्त

कमी भावात सोने देण्याचे अमिष दाखवून मार्केटयार्डातील एका डाळींब व्यापार्‍याला ७५ लाख रुपये लंपास करणार्‍या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून तीन महागडे मोबाईल, ७५ लाख रुपये जप्त केले. पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मदन मोतीराम साळुंके (वय ४०, रा.मातोरी, जि.नाशिक), शरद विठ्ठल ढोबळे (वय ४२, रा.नाशिक), मनेश श्रीराम पाटील (वय ४०, रा.सिडको, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केटमध्ये डाळींब व्यापारी ईश्वर त्रिभुवन गुप्ता यांचे दुकान आहे. मदन साळुंखे याने ३० हजार रुपये प्रती तोळा प्रमाणे स्वस्तात सोने विकणारी व्यक्ती आपल्याला माहिती असल्याचे वामन पिंगळे यांनी ईश्वर गुप्ता यांना सांगितली. मोहापोटी गुप्ता यांनी पिंगळे यांना स्वस्तात सोने देणार्‍या व्यक्तीसोबत चर्चा केली. त्यात ७५ लाख रुपयात अडीच किलो सोने देण्याचे ठरले. गुप्ता यांनी बँकखात्यातून ७५ लाखाची रोख रक्कम काढली. ती रक्कम मदन साळुंखे याचे ताब्यात दिली. ती रक्कम कारमधून घेऊन तिघेजण अडीच किलो सोने घेण्यासाठी निघाले. दरम्यान, मदन साळुंखे याने बारावकर हॉटेलजवळ गाडी थांबवली. पैसे देऊन सोने घेऊन येतो, असे सांगत मदन साळुंखे पैशाची बँग घेऊन निघून गेला. बराच वेळ झाल्यानंतर साळुंखे परत आला. त्याने आपल्याला मारहाण करुन चोरट्यांनी पैशांची बॅग हिसकावून घेतल्याचा बनाव केला. त्यानंतर तिघे परत मार्केटयार्डात आले. पिंगळे याला कारमधून उतरवून दोघे फरार झाले. या दोघांची बराच वेळ वाट बघूनही दोघे परत आलेच नाही. त्यातून फसवणूक झाल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ म्हसरुळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.

- Advertisement -

मंगळवारी (दि.२२) मदन साळुंके ड्रीम कॅसलजवळ, मखमलाबाद रोड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळू लागला. पोलिसांना त्याला पाठलाग करत अटक केली. चौकशीत त्याने संतोष ढोबळे, शरद ढोबळे व मनेश पाटीलसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी शरद ढोबळे व मनेश पाटील यास अटक केली.

असा रचला लुटीचा कट

- Advertisement -

सूत्रधार संतोष ढोबळे व संशयितांना पैशांची गरज असल्याने ३० हजार दराने सोने मिळणार आहे. दीड सोने असल्याचा बनाव करु. सोने खरेदीसाठी मोठी पार्टी पाहवी लागेल. दीड किलो सोने ७५ लाख रुपयांना भाव ठरवून त्या पार्टीला सोने दाखवून विश्वास संपादन करु व सोने न देता ७५ लाख रुपये घेऊन पळून जावू. त्यानंतर रक्कम वाटून घेऊ, असा कट रचल्याने तिघांनी पोलिसांना सांगितले. तिघांनी २० तोळे सोने खरेदी करुन ३० हजार रुपये तोळा या भावाने खरेदी केल्याचे दाखवले. ही बाब वामन पिंगळेने व्यापारी गुप्तांना सांगितले. त्यातून दीड किलो सोने ७५ लाखांना देणे-घेण्याचा व्यवहार ठरला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -