घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'झेडपी' मुख्यालयाचा प्राथमिक शिक्षण विभाग विद्युततारांच्या विळख्यात; कर्मचारी भीतीच्या छायेत

‘झेडपी’ मुख्यालयाचा प्राथमिक शिक्षण विभाग विद्युततारांच्या विळख्यात; कर्मचारी भीतीच्या छायेत

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात विद्युत वायर्सचे जाळे जमिनीवर पसरल्याने या विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करुन विभागाला विद्युत वायर्सच्या जाळ्यातून मुक्त करावे अन्यथा काही अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्राथमिक शिक्षण विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या टेबलखाली, खुर्चीखाली विद्युत वायर्सचे जाळे पसरले आहे. ज्या विद्युत वायर्स भिंतीवरुन, स्लॅबला लागुन असायला हव्यात मात्र या विद्युत वायर्स फर्चीवर पसरल्या आहेत. छतावरच्या तारा जमिनीवर लोंबकळत आहेत, यामुळे कर्मचार्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षण विभागात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून सातत्याने अभ्यागत कामनिमित्त भेटी देत असतात. यामुळे या विभागात कायम वर्दळ असते. कामाचा लोड अधिक असल्याने महिला व पुरुष कर्मचारी सतत धावपळ करीत असतात अशावेळेला एखादा कर्मचारी या विद्युत वायर्सच्या जाळ्यामध्ये पाय अडकून पडण्याची भीती आहे.

- Advertisement -

संगणकाच्या वायर्स आणि विद्युत वायर्स यांचे जाळे पसरल्याने यावर पाय पडून एखाद्या वेळेला वीजेचा धक्का बसण्याची भीती आहे. अशावेळी एखादी अप्रिय घटना घडू शकते. प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करते तरी कसे असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. संपूर्ण जिल्ह्याची पालकसंस्था असलेली जिल्हा परिषद विद्युत तारांच्या विळख्यात सापडलेली असेल तर जिल्हावासियांच्या समस्या दूर कशा होणार अशीही चर्चा यानिमित्ताने ऐकायला मिळत आहे.

कर्मचारी भीतीच्या सावटात  

प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचारी भीतीच्या सावटात काम करीत असून प्रशासनाकडे तक्रार करायला कुणीही धजावत नाही. यामुळे ही समस्या कायम आहे. प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन विभागाला विद्युत तारांच्या विळख्यातून मुक्त करावे अशी मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -