घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेची बस सुसाट; दिवसभरात लाखाचे उत्पन्न

महापालिकेची बस सुसाट; दिवसभरात लाखाचे उत्पन्न

Subscribe

दिवसभरात ४ हजार २१९ हून अधिक प्रवाशांनी बससेवेचा घेतला लाभ

महापालिकेतर्फे सुरु केलेल्या बससेवेला नाशिककरांनी दुसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी (दि.९) दिवसभरात ४ हजार २१९ हून अधिक प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला. त्यामुळे महापालिकेला दिवसभरात एक लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले.

शहरात महापालिकेतर्फे गुरुवार (दि.८)पासून बससेवा सुरु करण्यात आली असून, पहिल्या दिवशी एक हजारहून अधिक प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला. लोकार्पण सोहळा झाल्यानंतर बससेवा सुरु करण्यात आली. २७ बसच्या माध्यमातून रात्री ९ वाजेपर्यंत १ हजार २५४ प्रवाशांनी बसमधून प्रवास केला.नाशिक महापालिकेच्या वतीने सिटीलिंक ही सेवा सुरु करण्यात आली आहे. मोबाईल अ‍ॅपसह अन्य तंत्रज्ञानावर आधारित ही सेवा वेगळी आहे. दीड वर्षापासून नाशिक महापालिकेतर्फे बससेवा सुरु करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने शहरातील बस फेर्‍या कमी केल्या होत्या. परिणामी, शहरातील नागरिकांना ये-जा करण्यात अडचणी येत होत्या. अनेकांना बस मिळत नसल्याने रिक्षावर अवलंबून रहावे लागत होते.

- Advertisement -

४ हजार २१९ हून अधिक प्रवाशांनी घेतला लाभ

पहिल्या व दुसर्‍या दिवशी २७ बस रस्त्यावर आल्या. त्यापैकी २० बस सीएनजी, तर ७ बस डिझेलच्या होत्या. नाशिक महापालिकेने जाहीर केलेल्या नऊ मार्गांवर १६४ बस फेर्‍या झाल्या होत्या. शुक्रवारी दिवसभरात ४ हजार २१९ हून अधिक प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -