घरमहाराष्ट्रनाशिक३०० कोटी खर्चापेक्षा फेरनिविदा काढा; स्मार्ट सिटीबाबत शिवसेनेची भूमिका

३०० कोटी खर्चापेक्षा फेरनिविदा काढा; स्मार्ट सिटीबाबत शिवसेनेची भूमिका

Subscribe

स्मार्ट सिटीच्या कामांच्या वाढीव निविदा आल्याने तब्बल ३०० कोटींचा फटका महापालिकेला बसणार आहे. या प्रकरणी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत जादा दराच्या निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी केली आहे.

शहर विकासासाठी स्थापन केलेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून एकही प्रकल्प पूर्णत्वास आलेला नसताना तब्बल ३५ ते ६० टक्के जादा दराच्या निविदा आल्या आहेत. या वाढीव दराच्या निविदांचा घोळ महापालिकेच्या माथी मारुन तीनशे कोटी रुपयांसाठी महापालिकेला कर्जबाजारी केले जात आहे. या संदर्भात स्मार्ट सिटीच बरखास्त करण्याची मागणी कंपनीचे संचालक तथा नगरसेवक शाहू खैरे व गुरुमित बग्गा यांनी केली होती. या वादात आता शिवसेनेनेही उडी घेत जादा दराच्या निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी सांगितले, कोणत्याही कामाच्या निविदा १० टक्यांपेक्षा जादा दराने जाऊ नये. तसेच कंपनीच्या आढावा बैठकीत निविदांविषयी माहिती देण्यात यावी. त्याचप्रमाणे गावठाण विकासाची कामे एकाच कंत्राटदार कंपनीस न देता रस्ते, पाणीपुरवठा, मलवाहिका अशा स्वरुपात देण्यात यावी. जेणेकरून कमी दरातील निविदा प्राप्त होतील. शिवाय कामांसाठी कालापव्यय होणार नाही.

खर्चाचा प्रयत्न केल्यास हाणून पाडू

प्रोजेक्ट गोदाची निविदा तब्बल ६० टक्के जादा दराने जात असताना महापालिका प्रशासनाला त्याबाबत कोणतेही गांभीर्य दिसत नाही. बिकट आर्थिक परिस्थितीत स्मार्ट सिटीच्या नावाने ३०० कोटी खर्च करणे योग्य नाही. तसा प्रयत्न कोणी केल्यास आम्ही तो हाणून पाडू. स्मार्ट सिटीचे दिवास्वप्न ठरू नये ही अपेक्षा. – अजय बोरस्ते, विरोधी पक्ष नेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -