घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबकरोडवर परराज्यातील मद्यसाठा जप्त

त्र्यंबकरोडवर परराज्यातील मद्यसाठा जप्त

Subscribe

'ड्राय डे'ला उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई, सातपूर येथील एकाला अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी (१२ जुलै) रात्री त्र्यंबकरोडवर केलेल्या कारवाईत राज्यात प्रतिबंधीत मद्यसाठा जप्त केला. आषाढीला ड्राय डे असतानाही अवैधरित्या दारुविक्री होणार असल्याची कुणकुण लागल्याने विभागाने सापळा रचला होता. याप्रकरणी सातपूर येथील एकाला अटक करण्यात आली आहे.

त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरीजवळ पथकाने एका मारुती कारला (एम.एच.-१५., डी. सी.-५१५८) थांबवले. या गाडीच्या तपासणीत महाराष्ट्रात बंदी असलेला मोठा मद्यसाठा पथकाने जप्त केला. मध्यप्रदेश, हरियाणा, गोवा राज्यांसह दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मान्यता असलेल्या मद्याचा यात समावेश आहे. वाहनासह सुमारे २ लाख ६६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. या कारवाईत सातपूरच्या महालक्ष्मी नगरातील समाधान आबा गायकवाड याला पथकाने अटक केली. निरीक्षक एस. डी. चोपडेकर, दुय्यम निरीक्षक आर. आर. धनवटे, जे. एस. जाखेरे, जवान विष्णु सानप, गौरव तारे, विजेंद्र चव्हाण, रमाकांत मुंडे, किरण कदम, सहायक दुय्यम निरीक्षक हेमंत नेहरे, वाहनचालक गोकुळ परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास आर. आर. धनवटे करत आहेत.

- Advertisement -

१३ दिवसांत ४० गुन्हे

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जुलै महिन्यात एकूण ४० गुन्हे नोंदवत ३३ आरोपींना अटक केली. या कारवाईत देशी- विदेशी, हातभट्टी, परराज्यातील मद्यासह या वाहतुकीसाठीची तीन वाहनेही जप्त करण्यात आली. एकूण ४ लाख ३२ हजार २२७ हजारांचा मुद्देमाल पथकांनी जप्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -