घरमहाराष्ट्रनाशिकसासरकडचेही चांगलं प्रेम देतात; सुप्रिया सुळे यांचा भुजबळ यांना उद्देशून टोला

सासरकडचेही चांगलं प्रेम देतात; सुप्रिया सुळे यांचा भुजबळ यांना उद्देशून टोला

Subscribe

भुजबळ दिवसभरातील एकही मीटिंगला उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश करण्याच्या बातम्या येत असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना याबाबत काही लोक सासरकडून माहेरी जात असल्याबाबत विचारणा केली असता सासर माहेर ह्या जुन्या रूढी झाल्या आहेत आणि मला माझ्या माहेरी जेवढ प्रेम मिळालं तेवढंच माझ्या सासरी देखील मिळतं असे विधान करत भुजबळ यांना टोला लगावला. स्वतः छगन भुजबळ पक्षाच्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या दिवसभरातील एकही मीटिंगला उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार होऊन पक्षांतरबाबत होणार्‍या चर्चा खर्‍या आहेत की काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

एका बाजूला नाशिक शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर जाऊन भुजबळांना पक्षात न घेण्याची विनंती करतात आणि दुसरीकडे भूजबळ अधिकृत काहीही वक्तव्य करत नाही आणि पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहत नाही त्यामुळे नक्की काय? असा प्रश्न सेना तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा…. भूजबळ सेनेत गेल्यास मातोश्रीला हा बदल मानवणार का ? 

नाशिकमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी भूजबळ यांबाबत बोलताना प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पक्ष सोडून जणार्‍यांना माझ्या शुभेछाच आहे कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उभारणीसाठी त्यांनी माझ्या वडिलांना साथ दिली आहे त्याची जाणीव मला आहे.

‘सध्या पक्षाचा कठीण काळ सुरू आहे. अशा परिस्थितीत माणसं सोडून गेली की वाईट वाटतं. कारण आम्ही केवळ पक्ष म्हणून नव्हे तर कुटुंब म्हणून काम करतो. त्यामुळं वाईट वाटणं साहजिक आहे. तरीही आपल्याकडं लोकशाही आहे. प्रत्येकाला स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. कुणावरही दबाव टाकणं हे आमच्या तत्वात बसत नाही,’ असं त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -