Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक उतरणार रस्त्यावर

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक उतरणार रस्त्यावर

वेतनाचा खेळखंडोबा झाल्याने शिक्षकांनी दिला आंदोलनाचा इशारा

Related Story

- Advertisement -

शिक्षकांच्या विविध तक्रारी अडचणी व मागण्यांसंदर्भात गेल्या महिनाभरापासून शिक्षण उपसंचालक वेतन पथक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यासमोर विविध आंदोलने करूनही शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. याच्या निषेधार्थ 28 जून रोजी आंदोलनाचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनाचा खेळखंडोबा झालेला आहे, यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालय वेतन पथक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यात विविध प्रकारची आंदोलने करण्यात आले. शिक्षणाधिकारी त्यांच्या कार्यालयात थांबत नाहीत सह्या करत नाहीत, वेतन पथक अधीक्षक उदय देवरे हे कार्यालयात थांबत नाहीत, त्यांच्या कार्यालयात येणार्‍या मुख्याध्यापक शिक्षक व लिपिकांशी ते वर्तणूक करतात. नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने सोमवार दि.28 जूनपासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा संघटनेच्या पदाधिकार्‍यांना कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार यांना दिला. याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव भामरे, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, कार्यवाह आर. डी. निकम, निलेश ठाकूर, जयेश सावंत, त्र्यंबक मार्तंड, राजेंद्र शेळके, मधुकर भांडारकर उपस्थित होते.

- Advertisement -