घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसातपूरच्या 'त्या' परप्रांतीय महिलेच्या हत्येचे कारण आले समोर; मुख्य संशयित ताब्यात

सातपूरच्या ‘त्या’ परप्रांतीय महिलेच्या हत्येचे कारण आले समोर; मुख्य संशयित ताब्यात

Subscribe

नाशिक : नाशिक शहरातील सातपूर गावठाण परिसरात विधाते गल्ली याठिकाणी मंगळवारी (दि. २६)  सकाळच्या सुमारास एका भाडेकरी परप्रांतीय महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. काही वेळापूर्वीच मृत विवाहित महिलेचा नवरा कामावर गेला होता. त्यानंतर महिलेच्या १० वर्षाच्या मुलीने हा मृतदेह सर्वप्रथम बघितला होता. अवघ्या ३ दिवसापूर्वी या खोलीत भाड्याने वास्तव्याला आलेल्या २७ वर्षीय विवाहितेचा अशा पद्धतीने क्रूरतेने हत्या झाल्याने गुन्ह्याचे गूढ अधिकच वाढले होते. मात्र, सातपूर पोलिसांनी तपासची चक्र फिरवत मुख्य संशयिताला ताब्यात घेत. हत्येच्या कारणांचाही उलघडा केला आहे.

दरम्यान, मंगळवारी (दि. २६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका २७ वर्षीय अशोक्तीबाई शनीदयाल बैगा विवाहितेची अज्ञात व्यक्तीने  गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी सातपूर पोलीसानी मुख्य संशयित आरोपींस २४ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित जयकुमार परसराम बैगा या २६ वर्षीय युवकाने अशोक्तीबाई शनीदयाल बैगा हीचा खून केल्याच निष्पन्न झाले आहे. संशयित आरोपीची सीसीटीव्हीत संशयास्पद हालचाल दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

- Advertisement -

संशयित जयकुमार परसराम बैगा हाही सातपूर गावठाण परिसरातील विधाते गल्लीतील आनंद रघुनाथ नाठे यांच्याच घरात भाडेकरू म्हणून राहत होता. खून झालेली महिला संशयितांची नातेवाईक असून त्यांच्यात मध्यप्रदेशतील पाली तालुक्यातील आपल्या मूल गावी असलेल्या शेतजमिनी बाबत अशोक्तीबाई शनीदयाल बैगा याच्याशी वाद होता. या वादाच्या कारणातूनच खून केल्याचे संशयित जयकुमार परसराम बैगा याने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -