घरताज्या घडामोडीघोटीजवळ तीन बालिकांसह एका तरुणाचा अपघाती मृत्यू

घोटीजवळ तीन बालिकांसह एका तरुणाचा अपघाती मृत्यू

Subscribe

दुचाकी अपघात, दिवाळी खरेदीचा उत्साह क्षणार्धात बदलला दुःखात

इगतपुरी – कुटुंबातल्या लहानग्यांसाठी दिवाळी खरेदी करून घराकडे परतणाऱ्या युवकासह मोटरसायकवरील तीन लहान बालिकांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.८) घडली. या घटनेमुळे मुंढेगावसह इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली. अपघाताला कारणीभूत ट्रकचालक मात्र फरार झाला.

मुंढेगाव येथील तुषार हरी कडू (वय २४) हा युवक दिवाळीनिमित्त मोटारसायकलने घोटीला खरेदीसाठी पायल ज्ञानेश्वर गतीर (वय ११), विशाखा ज्ञानेश्वर गतीर (वय ८, रा. मुंढेगाव), ईश्वरी हिरामण डावखर (वय १०, रा. गिरणारे, ता. इगतपुरी) यांना घेऊन घोटीला गेला होता. खरेदीनंतर गावाकडे परतताना त्यांच्या दुचाकीला एका आयशर ट्रकने अचानक कट मारला. यात संतुलन गेल्याने मोटारसायकलीवरील चौघेही रस्त्यावर पडले आणि याचवेळी या सर्वांच्या अंगावरून ट्रक गेला. यात सर्व अक्षरशः चिरडले गेले. अपघातानंतर आयशरचालक गाडी घेऊन फरार झाला.

- Advertisement -

या घटनेमुळे मुंढेगाव परिसरासह इगतपुरी तालुक्यात प्रचंड शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती समजताच घोटी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मृत ३ मुली व युवकाला घोटी ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन, पोलीस कर्मचारी प्रकाश कासार, लहु सानप, शीतल गायकवाड आदी अधिक तपास करत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -