घरमहाराष्ट्रनाशिकSwine Flu : नाशिकमध्ये स्वाइन फ्लुमुळे महिलेचा मृत्यू; प्रशासन अलर्टवर

Swine Flu : नाशिकमध्ये स्वाइन फ्लुमुळे महिलेचा मृत्यू; प्रशासन अलर्टवर

Subscribe

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उष्माघातामुळे नागरिकांची तब्येत बिघडत असतानाच आता नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला आहे. स्वाइन फ्लुची लागण झाल्यामुले सिन्नरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून आणखी तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. याचपार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागाने काही मार्गदर्शन तत्वे जाहीर केले आहेत. (Woman dies due to swine flu in Nashik Administration On Alert)

नाशिकच्या सिन्नरमध्ये महिलेचा मृत्यू झाला असून आणखी तीन रुग्ण सापडले आहेत. या तिघांवर नाशिक शहरता उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र स्वाइन फ्लुच्या संसर्गामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आली आहे. पालिकेने पत्रक काढत नागरिकांना आवाहन करत विशेष सूचना दिल्या आहेत. स्वाइन फ्लु हा रोग विषाणूपासून होतो आणि तो हवेमार्फत पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यांतून किंवा खोकल्यातून उडणाऱ्या थेंबावाटे एका रुग्णापासून निरोगी रुग्णाकडे पसरतो. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि शीतपेय पिताना सावधानी बाळगा, असे अवाहन पालिकेने केले आहे. तसेच ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा आणि लहान मुलांमध्ये जुलाब उलटी अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही पालिकेने म्हटले आहे.

- Advertisement -

या गोष्टी कराव्यात (Do these things)

  1. वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुणे गरजेचे
  2. पौष्टिक आहार घ्यावा
  3. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचे आहारात सेवन करावे
  4. धूम्रपान टाळावा
  5. पुरेशी झोप व विश्रांती घेणे गरजेचे
  6. भरपूर पाणी गरजेचे
  7. खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा

या गोष्टी करू नये (Don’t do these things)

  1. कोणत्याही व्यक्तीसोबत हात मिळवू नये
  2. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
  3. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये
  4. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
  5. संशयित रुग्णांच्या संपर्कात जाऊ नये
  6. लक्षणे आढळल्यास मुलांना शाळेत पाठवू नका

दरम्यान, जानेवारी 2022 मध्ये नाशिक शहर स्वाइन फ्लुच्या विळख्यात सापडले होते. या कालावधीत शहरात 150 हून अधिक स्वाइन फ्लुचे रुग्ण सापडले होते, त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला होता. पालिका क्षेत्राच्या बाहेर स्वाइन फ्लुचे 86 रुग्ण सापडले होते, त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता एका वर्षानंतर स्वाइन फ्लुमुळे आरोग्य व वैद्यकीय विभाग सतर्क झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गरज पडल्यास शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लु कक्ष पुन्हा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -