घरताज्या घडामोडीAryan Khan Drug Case: ड्रग्ज प्रकरणात खोट्या माहितीच्या आधारे मला गोवण्याचा कट;...

Aryan Khan Drug Case: ड्रग्ज प्रकरणात खोट्या माहितीच्या आधारे मला गोवण्याचा कट; वानखेडेंचं पोलीस आयुक्तांना पत्र

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आज दुपारपासून महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज दुपारी याप्रकरणात पंच म्हणून असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये प्रभाकर साईल यांनी ड्रग्ज प्रकरणातील खळबळजनक खुलासे केले. आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे केल्याचा दावा प्रभाकर साईलने या व्हिडिओतून केला. पण आर्यनच्या सुटकेची डील १८ कोटी रुपयांची झाली. यामधील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंचे आणि उरलेले पैसे इतरांमध्ये वाटून घ्यायचे, असे गोसावीचे झालेले संभाषण प्रभाकरने ऐकल्याचे सांगितले. त्यामुळे समीर वानखेडे या आरोपांवर काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते. काही तासांनंतर एनसीबीने एक पत्रक जारी करून प्रभाकरने लावले सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यात वानखेडे म्हणाले की, ‘याप्रकरणात मला चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातंय.’ त्यामुळे संभाव्य कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी वानखेडेंनी केली.

प्रभाकर साईल याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. तसेच याप्रकरणात महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी सखोल चौकशी करावी. शिवाय सुमोटो कारवाई करावी, अशा मागण्या केल्या जाऊ लागल्या. त्यानंतर एनसीबीद्वारे एक पत्रक जारी करून प्रभाकर साईलने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. प्रभाकर साईलला जे काही सांगायचे आहे, ते न्यायालयासमोर सांगावे, सोशल मीडियावर नाही, असे एनसीबीकडून सांगण्यात आले. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र पाठवले आहे आणि याची एक प्रत पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवण्यात आली आहे.

- Advertisement -

समीर वानखेडे पत्रात म्हणाले की, ‘आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मला चुकीच्या पद्धतीने अडकवलं जात आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये.’

- Advertisement -

हेही वाचा – Cruise Drugs Case: आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखकडे २५ कोटींची मागणी, समीर वानखेडेंचा ८ कोटींचा हिस्सा!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -