उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, जयंत पाटलांचा राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत इशारा

for flood control Jayant Patil to discuss Almatti Dam with Karnataka Water Resources Minister
जयंत पाटील अलमट्टी धरणाबाबत कर्नाटक जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करणार, पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांना महत्त्वाचे निर्देश

राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातवारण चांगलेच तापलं आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रात सहा जागांवर निवडणूक होत आहे. परंतु भाजपकडून सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये दोन मल्ल आमने सामने आले आहेत. दरम्यान अपक्षांच्या पाठिंब्यामुळे आम्ही सहावा उमेदवार दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महाराष्ट्रातील चित्र स्पष्ट होईल. विधानसभेत घोडेबाजार पाहिला नाही. त्यामुळे राज्यसभेच्या वेळी घोडेबाजार होईल असे वाटत नसल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, भाजपला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो. त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांना संधी देण्यात आली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपकडून सहाव्या जागेसाठी उमेदावर

भाजपने राज्यसभेसाठी तीन उमेदावारांना संधी दिली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील भाजप माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे तिसऱ्या जागेसाठीची लढत चांगलीच चुरशीची ठरणार आहे. शिवसेनेकडून कोल्हापूरमधील जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु राज्यसभेवर कोण जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा : चूक नसतानाही काँग्रेसची चूक दाखवण्याची परंपरा सुरूच, नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका