‘…मार्केटमध्ये इज्जत असावी लागते’, निलेश राणेंचा राऊतांना टोला

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवत त्यांना न्यायालयात उत्तर द्यायला लावणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी पाठवलेल्या नोटीसीनंतर भाजप नेते निलेश राणे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहेत.

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवत त्यांना न्यायालयात उत्तर द्यायला लावणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी पाठवलेल्या नोटीसीनंतर भाजप नेते निलेश राणे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहेत. त्यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत यांनी राणेसाहेबांवर बदनामीचा दावा दाखल केला आहे. मुळात बदनामीचा दावा दाखल करायला मार्केटमध्ये कसलीतरी इज्जत असावी लागते’ असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. (ncp leader nilesh rane strongly criticized thackeray group mp sanjay raut)

निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसीनंतर निलेश राणे आक्रमक झाले आहेत. ‘संजय राऊत यांनी राणेसाहेबांवर बदनामीचा दावा दाखल केला आहे. मुळात बदनामीचा दावा दाखल करायला मार्केटमध्ये कसलीतरी इज्जत असवी लागते’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

‘नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांना मी भाजपाचे पोपटलाल समजतो. मागचा पुढचा विचार न करता ते फक्त पोपटासारखे बोलत राहतात. त्यामुळे या दोघांविरोधात मी कायदेशीर नोटीस पाठवून न्यायालयात उत्तर द्यायला लावू. ही लोक भन्नाट आणि बिनबुडाचे आरोप करत असतात. आमच्या सगळ्यांबाबत ते काहीही विधान करत असतात. त्यामुळे आता वेळ आली असून, आता आम्ही कायदेशीर लढाई लढण्याचे ठरवले आहे’, अशा इशारा संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिला होता.


हेही वाचा – गुंतवणूकदारांना पाहिजे न्याय; अदानी समूहाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात