घरमहाराष्ट्रआम्ही काहीही करू शकतो हे दाखवण्यासाठी मला अटक; जामीनानंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

आम्ही काहीही करू शकतो हे दाखवण्यासाठी मला अटक; जामीनानंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

ठाण्यातील विवियान मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडत प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना न्यालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या जामीनांतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदे घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच या अटकेवरून आव्हाडांनी शिंदे फडणवीस सरकारही अप्रत्यक्ष टीका केली आहे. कायदा आपल्याला हवा तसा वापरू शकतो. आम्ही काहीही करु शकतो हे दाखवण्यासाठी मला अटक करण्यात आली असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

मला अटक करताना पोलिसांच्या डोळ्यात हतबलता दिसत होती. पोलिसांचा या प्रकरणात कोणताही दोष नाही, त्यांच्यावर दबाव होता. मला चौकशीसाठी बोलवलं आणि अटक केली. शिवरायांच्या बदनामीला विरोध केल्यानेच मला अटक करण्यात आली असा आरोपही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

मला 41 अन्वये अंतर्गत दुपारी 2 वाजता नोटीस देण्यात आली होती, ज्यात चौकशीला 5 वाजता हजर राहण्यास सांगितले होते. त्या आधीच 2.30 वाजता मला अटक करण्यात आली. अटक करताना कोणतेही कलम पाळलं गेलं नाही. माझ्यासह असलेल्या 12 आरोपींच्या नोटीसीवरती क्रिमीनल अमेंटमेंट अॅक्ट 1932 सेक्शन 7 मी सोडून कोणाच्या नोटीसीवर टाकलं नाही. यात आव्हाडांना एक दिवस जेलमध्ये ठेवायचं असेल तर कोणतं कलम लावता येईल याचा विचार झाला. या कलमाअंतर्गत त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी तक्रादार मिळत नव्हता म्हणून त्यांनी मॉल आणि सिनेपॉलीसच्या लोकांवर जोरजबरदस्ती केली, असा आरोपही आव्हाडांनी केला आहे.

दरम्यान हर हर महादेव चित्रपटाला त्यांचा विरोध का आहे, त्यामागे काय भूमिका आहे याबाबत आव्हाडांनी चित्रफितीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. यावेळीही हर हर महादेव या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या संबंधित चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच या चित्रफितीतील घटनांचा इतिहासाशी कोणताही संबंध नसल्याचेही आव्हाड म्हणाले. यासोबत सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शकांनी चुकीचा इतिहास दाखवला असून त्यांनी लोकांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.

- Advertisement -

आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात हर हर महादेव हा चित्रपट कुठेही लागू नये यासाठी मी विरोध केला होता, आणि यापुढेही करणार आहे. जामीन देणारे गुन्हे दाखल असताना मला आत कसं बसवता येईल यासाठी दबाव टाकण्यात आला. यातून जितेंद्र आव्हाडांना आतमध्ये आम्ही बसून दाखवलं हे महाराष्ट्राला दाखवायचं होतं. यासाठी माझ्यावर सेक्शन 7 क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट लावण्यात आला आणि नॉन बेलेबल सेक्शन लावला. अधिकाराचा चुकीचा वापर करत दबाव टाकण्यात आला. हे काम कोणाचं वेगळं सांगायला नको त्यांचं नाव सुद्धा मला काढायच नाही.


महाराष्ट्रातून प्रकल्प गेल्याचा कांगावा करणं चुकीचं; ‘त्या’ प्रकल्पावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -