घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटलांनी वाटल्यास डोक्यावर दगड ठेवावा... पवारांचा खोचक टोला

चंद्रकांत पाटलांनी वाटल्यास डोक्यावर दगड ठेवावा… पवारांचा खोचक टोला

Subscribe

राज्यात नवीन सरकार येणे गरजेचे होते, स्थिरता देऊ शकेल अशी एका नेत्याची गरज होती, पण अक्षरश: आम्ही छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आणि दिल्लीतून निर्णय आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. अस विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले होते. याच विधानावरून शरद पवारांनी खोचल टोला लागवला आहे. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, “त्यांनी दगड डोक्यावर ठेवायचा की छातीवर… हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.” अशा शब्दात पवारांनी भाजपला टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला.

हेही वाचा : लवकरच व्याजासह वस्त्रहरण करू, नारायण राणेंच्या सुपारीवरून नितेश राणेंचा इशारा

दरम्यान राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर पवार म्हणाले की, “राज्याची संपूर्ण सत्ता केंद्रीत करून ठेवत दोघांनीच सरकार चालवायचं ठरवलं दिसतंय. त्यांना त्यांच्या राज्यातील सहकाऱ्यांची आणि केंद्रातील नेतृत्वाची साथ आहे. ते आता सत्ताधारी आहेत म्हणून साहजिकच ते जे काय करतील ते आपल्याला स्वीकारावं लागेल. आम्ही आता विरोक्षी पक्षात आहोत” असं मत व्यक्त शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

- Advertisement -

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवरीव प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणेल की, पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देण योग्य नाही. यातून त्यांनी नितेश राणेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असतानाही शिंदे यांना झेड सुरक्षा देण्यास माजी मुख्यमंत्री आण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्याचा आरोप शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. तर आमदार शंभूराज देसाई यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. दरम्यान या प्रकरणावरून राजकीय वाद रंगत असताना यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील उडी घेतली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना झेड सिक्युरिटी आधीही होती आणि आताही आहे अस स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना झेड सिक्युरिटी आधीही होती आणि आताही आहे; शरद पवारांनी केले स्पष्ट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -