लवकरच व्याजासह वस्त्रहरण करू, नारायण राणेंच्या सुपारीवरून नितेश राणेंचा इशारा

bjp mla nitesh rane slams shiv sena and uddhav thackeray

राज्यात मुखमंत्री एकनाथ शिंदे गटाविरुद्ध उद्धव ठाकरे असा नवा राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. सातत्याने शिंदे समर्थक गटासह भाजपमधील नेत्यांकडूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटावर आरोप केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरून आमदार सुहास कांदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. याता यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझे वडिल नारायण राणे यांनी जेव्हा सोडली, तेव्हा त्यांना संपवण्यासाठी अनेक सुपारी दिल्या गेल्या. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नितेश राणे यांनी ट्विटद्वारे हे आरोप केले आहेत. तसेच लवकरचं व्याजासह वस्त्रहरण सुरु करू असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे यांचे ट्विट

एकनाथ शिंदे जींप्रमाणे.. माझ्या वडिलांनी सेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी अनेक “सुपारी” दिल्या गेल्या.. तथाकथित विवेकी- सभ्य पक्षप्रमुखाने! म्याऊ म्याऊ संपू दे.. मग आम्ही व्याजासह “वस्त्रहरण” सुरू करू.

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. “एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती.” असा दावा सुहास कांदे यांनी केला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेट तापले आहे. असे असतानाच नितेश राणे यांच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : शिंदे सरकारचा ठाकरे सरकारच्या कामांना धक्का; 14 महिन्यांतील निविदा कामांना स्थगिती