घरमहाराष्ट्रपुणेअजित पवारांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ? जयंत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण

अजित पवारांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ? जयंत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण

Subscribe

जे आमच्यातून गेले आहेत, त्यांना कदाचित निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि नाव देण्याचे कबूल केले असेल, असे जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

पुणे : 2022 मध्ये ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले, अगदी तसेच काहीसे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत देखील घडण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये देखील दोन गट पडलेले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा करण्यात आला आहे. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया आणखीनच उंचावल्या आहे. जे आमच्यातून गेले आहेत, त्यांना कदाचित निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि नाव देण्याचे कबूल केले असेल, असे जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (NCP watch in the hands of Ajit Pawar? Jayant Patil statement sparks discussions)

हेही वाचा – महानगरच्या ‘त्या’ बातमीचा दणका; महापालिकेच्या अनागोंदी विरोधात माजी नगरसेवक उचलणार मोठे पाऊल

- Advertisement -

पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना हे विधान केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “जे आमच्यातून गेलेले आहेत त्यांचा दावा आपण पाहिला असेल तर असेच दिसते की त्यांना निवडणूक आयोगाने कबूल केलेले दिसत आहे की, पक्षाचे चिन्ह आणि नाव त्यांच्याकडे जाणार. जर निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच झाला असेल तर सुप्रीम कोर्ट हाच त्याच्यावरचा उपाय आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत घडले तेच जर राष्ट्रवादीच्या बाबतीत घडले तर महाराष्ट्राची जनता ते माफ करणार नाही, मोठ्या रोषाला भाजपला सामोरे जावे लागेल.” त्यामुळे आता जयंत पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच, आता लवकरच शरद पवार यांच्या हातातून घड्याळ निसटून ते अजित पवार यांच्या हातात जाणार आहे, का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

मागील वर्षी अगदी अशीच परिस्थिती ही शिवसेनेवर ओढावलेली होती. शिवसेना ही ठाकरेंची असली तरी आमदारांची संख्या जास्त असल्यााकारणाने निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर ठाकरे गटाने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यामुळे भविष्यात जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असे काही घडले तर शरद पवार गट देखील कोर्टात धाव घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्षात फूट पाडलेली असली तरी राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडली नसल्याचा दावा करण्यात येतो. एकदा तर अजित पवार हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आले होते. तर अजित पवार गटाकडून सुद्धा पक्षात फूट पडली नसल्याचा दावा करण्यात येतो, ज्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेमके काय सुरू आहे, याबाबतचा कोणाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तर आता येणाऱ्या काळात राष्ट्रवादीसोबत देखील शिवसेनेसारखेच होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -