घरमहाराष्ट्रनील यांची पीएचडी 14 महिन्यांत नाही तर... किरीट सोमय्यांचा खुलासा

नील यांची पीएचडी 14 महिन्यांत नाही तर… किरीट सोमय्यांचा खुलासा

Subscribe

यासंदर्भांतील काही कागदपत्र सोशल मीडियावर व्हायलर झाली आहेत त्यानुसार, निल सोमय्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये त्यांचा प्रबंध सादर केला होता.

भाजपचे(bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) हे नेहमीच विरोधकांवर टीका करताना दिसतात. किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांचे घोटाळे सुद्धा घोटाळे बाहेर काढले आहेत. पण सध्या याच किरीट सोमय्या यांच्या मुलाची चर्चा सुरु आहे. नील सोमय्या यांनी 14 महिन्यात पीएचडीची पदवी मिळविल्याने एवढ्या कमी वेळात पीएचडीची पदवी कशी मिळविली याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान सोशल मीडियातील व्हायरल दाव्यानुसार, किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अवघ्या 14 महिन्यांत पीएचडी पदवी मिळवल्याच्या चर्चा सुरु आहेत. फक्त 14 महिन्यांमध्ये निल सोमय्यांनी (neil somaiya) पीचडी (Phd) कशी पूर्ण केली याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यावरूनच अक्तर नील सोमय्या त्यांच्या पीएचडी वरून वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

यासंदर्भांतील काही कागदपत्र सोशल मीडियावर व्हायलर झाली आहेत त्यानुसार, नील सोमय्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये त्यांचा प्रबंध सादर केला होता. त्यानंतर दीड महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये त्यांनी तोंडी परीक्षासुद्धा दिली होती. विशेष म्हणजे या तोंडी परीक्षेच्या दुसऱ्याचं नील सोमय्या यांना दिवशी पीएचडी पदवी मुंबई विद्यापीठाकडून बहाल करण्यात आली. याचेच फोटो नील सोमय्या यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. यावर नेटकऱ्यांनी १४ महिन्यात पीएचडी पदवी कशी काय मिळू शकते? असा उलट प्रश्न निल सोमय्या यांना केला.

किरीट सोमय्यांकडून मात्र आरोपांचे खंडण

- Advertisement -

या सर्व प्रकरणी किरीट सोमय्या आक्षेप घेत म्हणाले, सोशल मिडीयावर सध्या जे काही सुरू आहे ते चुकीचे आहे. नील सोमय्यांनी 17 सप्टेंबर 2016 रोजी परीक्षा दिली असे किरीट सोमय्या म्हणाले. दुसरा कागद नील सोमय्यांच्या पीएचडीच्या पूर्ण कार्यक्रमाचा आहे. यात पीएचडी रजीस्ट्रेशनची तारीख जून 2021 ची आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. हे सर्व नियमांमध्ये होत आहे असे किरीट सोमय्या म्हणाले. पण विरोधकांनी मात्र निल सोमय्या यांच्या पीएचडी वरून गैरसमज पसरवला. नील सोमय्या यांना पीएचडी पूर्ण करण्यासाठी 14 महिन्यांचा आरोप खोडून काढत पीएचडी करण्यासाठी नील सोमय्यांना 72 महिन्यांचा कालावधी लागल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.


हे ही वाचा – ठाकरे सेनेवर लाल रंगाची झालर; कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्यावरून भाजपची टीका

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -