घरताज्या घडामोडीराज्यात 2 हजार 203 नवे कोरोना रुग्ण; 3 जणांचा मृत्यू

राज्यात 2 हजार 203 नवे कोरोना रुग्ण; 3 जणांचा मृत्यू

Subscribe

राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येच्या आलेखात चढ-उतार होत आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्ये राज्यासह देशभरात वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय असल्याने लसीकरण सर्वत्र वाढवण्यात आले आहे.

राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येच्या आलेखात चढ-उतार होत आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्ये राज्यासह देशभरात वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय असल्याने लसीकरण सर्वत्र वाढवण्यात आले आहे. दरम्यान, गुरूवारी राज्यात 2 हजार 203 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (New 2203 corona patients in maharashtra and 2 died)

दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आज स्थिर असल्याचे चित्र आहे. राज्यात आज 2 हजार 478 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरातील 78 लाख 79 हजार 766 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.99 टक्के झाले आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोना मृत्यू दर हा 1.84 टक्क्यांवर पोहोचला आहे. राजयात आतापर्यंत 80 लाख 41 हजार 512 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यभरात आज 13 हजार 665 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यानुसार, 4 हजार 454 इतकी आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागत असून मुंबईमध्ये 1 हजार 806 सक्रिय रुग्णसंख्या आहे.

- Advertisement -

देशभरात मागील 24 तासांत 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 323 इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.33 टक्के आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.47 टक्के आहे.

बुधवारी देशात 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण आधीच्या दिवसाच्या तुलनेत अधिक आहे. तसेच, मंगळवारी 18 हजार 313 कोरोना रुग्णांची नोंद आणि 57 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात बुधवारी दिवसभरात 19 हजार 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – अखेर काय झाले? सोनिया गांधी- स्मृती इराणींच्या वादावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -