घरताज्या घडामोडीपुणे : 'त्या' रॅपप्रकरणी कारवाई करा, अजित पवारांचे शिंदे, फडणवीसांसह चंद्रकांत पाटलांना...

पुणे : ‘त्या’ रॅपप्रकरणी कारवाई करा, अजित पवारांचे शिंदे, फडणवीसांसह चंद्रकांत पाटलांना पत्र

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहले आहे. तसेच या पत्रातून कारवाईची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी शिक्षणाचे माहेघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आणि त्यातही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर चित्रित झालेल्या या रॅप साँगमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहले आहे. तसेच या पत्रातून कारवाईची मागणी केली आहे. (new controversy over a rap song filmed in pune university Ajit Pawar letter to CM DCM and Chandrakant patil)

अश्लील शब्द, शिव्यांचा भडीमार आणि हत्यारांचा वापर असलेल्या या रॅपचा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे.

- Advertisement -

अजित पवारांच्या पत्रात काय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आणि विद्यापीठ वास्तुला फार मोठा इतिहास आहे. अशा या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत अधिसभा भरते त्या ठिकाणी अश्लील भाषेतील रॅप साँगचे शूटिंग केले गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कुलगुरुच्या खुर्चीवर बसून समोरच्या टेबलवर दारूची बाटली आणि शस्त्र ठेऊन रंपरने रॅप साँग चित्रीत केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

हा सर्व प्रकार अत्यंत निंदनीय असून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारा आहे. या संदर्भात चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची तसेच विद्यापीठाने एक चौकशी समितीही नियुक्त केल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, या घटनेची शासन स्तरावरुन सुद्धा दखल घेण्याची आवश्यकता आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे राज्यातील जनतेत प्रचंड संतापाची भावना आहे. पोलीस तपास आणि चौकशी समितीचा अहवाल तातडीने प्राप्त करुन घेऊन संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनस्तरावरुन सुध्दा आदेश देण्यात यावेत, तसेच भविष्यात असा प्रकार कोणत्याही विद्यापीठात या शिक्षण संकुलात होणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना शासनामार्फत निर्गमित करण्यात याव्यात, अशी मागणी मी या पत्राव्दारे करीत आहे.

नेमके प्रकरण काय?

शुभम जाधव (रॉकसन) असं या रॅपरचे नाव आहे. त्याने केलेल्या या कृत्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संताप व्यक्त केला आहे. विद्यापीठाच्या तक्रारीनंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी संबंधित रॅपरला चौकशीसाठी बोलावले. या तरुणाची चौकशी केली गेली. विद्यापीठ सुरक्षा विभागाचे सहाय्यक अधिकारी सुधीर दळवी (५०) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चौकशीनंतर पोलिसांनी शुभम जाधव याच्याविरोधात कमल २९४, ४४८, ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – दिल्लीत उघडले Apple चे दिल्लीत दुसरे स्टोअर; CEO टिम कूकने केले उद्धाटन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -