घरमहाराष्ट्रनगर, नाशिक जिल्हा रुग्णालयात नवीन अग्निशमन यंत्रणा बसवणार

नगर, नाशिक जिल्हा रुग्णालयात नवीन अग्निशमन यंत्रणा बसवणार

Subscribe

५ कोटी ६७ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

राज्यात भंडारा जिल्हा रुग्णालय, इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालय, नगर जिल्हा रुग्णालय तसेच विरारमधील विजयवल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या घटनांनंतर आगीच्या घटनांना पायबंध घालण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने पहिल्या टप्प्यात नगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयात सुमारे ५ कोटी ६७ लाख रुपयांची अग्निशमन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

भंडारा जिल्ह्यातील विशेष नवजात बालक केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) शॉर्टसर्किटमुळे आग लागून दहा कोवळ्या जीवांचा बळी गेला होता. तर मुंबईजवळच्या विरारमधील विजयवल्लभ रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत १३ जणांना प्राण गमवावे लागले होते.

- Advertisement -

राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगींच्या घटनानंतर राज्य सरकारने फायर ऑडीटसाठी समिती नेमली होती. भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर राज्य सरकारने स्टेट ऑक्सिजन ऑडीट कमिटी नेमली होती. या समितीने राज्यातील रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन आणि स्ट्रक्चरल ऑडीट केले होते. त्यात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या होत्या. राज्यातल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा नसल्याचा ठपका या समितीने ठेवला होता. अनेक रुग्णालयांमध्ये फायर एस्टिंगविशरचा अभाव होता. काही फायर एस्टिंगविशरची कालमर्यादा संपुष्टात आली होती. तर काही फायर एस्टिंगविशरमधील द्रावण संपले होते. या समितीने राज्यातील ३ हजारांहून अधिक रुग्णालयांमध्ये फायर ऑडीट केले होते.

या समितीने ग्रामीण भागातील रुग्णालयांना भेटी देऊन राज्य सरकाला अहवालही सादर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसवण्याच्या कामाच्या आराखड्याला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या यंत्रणेसाठी ३ कोटी १४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातही अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी ३ कोटी १४ लाख रुपयांच्या खर्चासही आरोग्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -