घरताज्या घडामोडीपवारांच्या घरातील 'तो' फोटो शेअर करत राणे बंधूंचा ठाकरेंना सावधानतेचा इशारा

पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत राणे बंधूंचा ठाकरेंना सावधानतेचा इशारा

Subscribe

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज (सोमवार) १८ जुलै रोजी पार पडत आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु काल उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा काल विरोधकांनी केली. तर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. त्यामुळे राणे बंधूंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना सावधानतेचा इशारा दिला आहे.

शरद पवार यांनी त्यांच्या बैठकीचे फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले आहे. या फोटोत सर्व नेते शरद पवारांच्या घरातील हॉलमध्ये बसल्याचं दिसून येत आहे. परंतु या बैठकीला संजय राऊतांनी देखील हजेरी लावली आहे. त्यामुळे हा फोटो ट्विट करत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून या बैठकीला राऊत उपस्थित कसे असा प्रश्न विचारला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले नितेश राणे?

- Advertisement -

राऊतांचे नेते उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. मग विरोधी पक्षांच्या बैठकीला संजय राऊत काय करत आहेत?
आपल्या मालकाचा इमानदार पाळीव प्राणी! अजूनही वेळ गेलेली नाही उद्धवजी, असं ट्विट करत नितेश राणेंनी राऊतांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

मॅच हरल्यानंतर प्लेयर ड्रेसिंग रूममध्ये अशी कॅप्शन देत विरोधी पक्षांच्या बैठकीतल्या या फोटोला ट्विट करत भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

दरम्यान, विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली असून नामांकनाची अंतिम तारीख १९ जुलै आहे. ६ ऑगस्ट रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.


हेही वाचा :सिढिया चढते हुए जो, उतरना भूल जाते है.., संजय राऊतांची शिंदे गटावर टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -