घरमहाराष्ट्रपुणे शहराचा आज पाणी पुरवठा बंद

पुणे शहराचा आज पाणी पुरवठा बंद

Subscribe

पुणे शहराचा आज पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

पुणे शहरात बुधवारी रात्री तीन तास झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे शहराला मोठा फटका बसला आहे. यामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेला देखील बसला आहे. त्यामुळे आज पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पद्मावती येथील पंपिंग स्टेशनमध्ये पाणी घुसल्यामुळे दांडेकर पुलालगतची मुख्य जलवाहिनी वाहून गेली आहे. त्यामुळे शहराच्या बऱ्याच भागातील पाणीपुरवठा गुरुवारी विस्कळित झाला. त्यामुळे आज, शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याभागातील पाणी पुरवठा राहणार बंद

पुण्यातील नवी पेठ, राजेंद्रनगर, डेक्कन, पुलाची वाडी, प्रभात रस्ता परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा, मार्केट यार्ड या भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. बुधवारी मध्य रात्री होणाऱ्या पावसामुळे सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा, मार्केट यार्ड या भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. जलवाहिनी पूर्ववत करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर हाती घेतले असले, तरी हे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने आज, शुक्रवारी सकाळी या भागांत पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. जलवाहिनी पूर्ववत होताच, या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आज एक्स्प्रेस-वे राहणार बंद!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -