Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र आता नवा मालक कोण? पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर नितेश राणेंचा राऊतांना मिश्किल सवाल

आता नवा मालक कोण? पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर नितेश राणेंचा राऊतांना मिश्किल सवाल

Subscribe

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांना डिवचलं आहे. आता महिन्याचा पगार अर्धा झाला आहे, आता काय होणार? असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टॅग केलं आहे. एवढचं नाही तर आता नवीन नोकरी कोणती असणार आणि नवा मालक कोण? असं सवाल करत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्तीचा निर्णय घेतला आणि राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. राजकारणातील ही एक खळबळ उडवणारी बातमी आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत राऊतांना मिश्किल टोला लगावला आहे. ( Now who is the new owner After the announcement of Sharad Pawars retirement BJP leader Nitesh Rane asked Raut a question )

मागच्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि नितेश राणे यांची शाब्दीक टोलेबाजी पाहायला मिळत आहे. आता शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर नितेश राणे यांनी राऊतांना डिवचत एक मिश्किल टोला लगावला आहे.

नेमंक काय म्हणाले नितेश राणे?

- Advertisement -

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांना डिवचलं आहे. आता महिन्याचा पगार अर्धा झाला आहे, आता काय होणार? असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टॅग केलं आहे. एवढचं नाही तर आता नवीन नोकरी कोणती असणार आणि नवा मालक कोण? असं सवाल करत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सभागृहात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रडले तर काही हात जोडून शरद पवारांसमोर उभे राहीले. तसचं, शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत. लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. कुठे थांबायचे हे मला कळतं, म्हणून एनसीपीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली.

शरद पवारांच्या या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले, काहींना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी तर पवारांचे पायही धरले. शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशा घोषणा शेकडो कार्यकर्त्यांकडून यावेळी देण्यात आल्या.

- Advertisment -