घरताज्या घडामोडीOBC Reservation : OBC राजकीय आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही, विजय वडेट्टीवारांनी भेट...

OBC Reservation : OBC राजकीय आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही, विजय वडेट्टीवारांनी भेट घेऊन मानले आभार

Subscribe

राज्य मागासवर्ग आयोग सकारात्मक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसींना दिलासा मिळू शकतो असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे राज्यपालांचे आभार मानन्यासाठी राज्याचे मदत व पूर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यापालांनी विधेयकावर स्वाक्षरी केली असल्यामुळे ओबीसी समाजाला मोठा फायदा होणार आहे. तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे विजय वडेट्टीवार राज्यपालांच्या भेटीनंतर म्हणाले. राज्यापालांना आणखी एका विधेयकावर स्वाक्षरी करण्याची विनंतीसुद्धा विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विधेयकावर राज्यापालांनी सही केल्यामुळे ओबीसी नेत्यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत. काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर वडेट्टीवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे विशेष आभार मानन्यासाठी ओबीसी नेते भेटायला आलो होतो. राज्यपालांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

आणखी एका विधेयकावर सही करण्याची विनंती

दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, त्यबरोबर दुसरं एक विधेयक पाठवले आहे ते म्हणजे संवर्गनिहाय प्राध्यापकांसाठी बिंदु नामावली लागू करायची. त्यामुळे त्या बिलावर सुद्धा स्वाक्षरी करावी अशी त्यांना विनंती केली आहे. मागच्या अधिवेशनात मंजूर करुन हे विधेयक राज्यपालांकडे पाठवण्यात आले आहे. गेल्या ६० वर्षांपासून ओबीसींचा प्राध्यापक होण्यास संधी नव्हती, कारण विशेषनिहाय आरक्षण होते त्यामुळे हे संवर्गनिहाय करावे अशी मागणी होती. त्या प्रकारची मागणी करुन अधिवेशनात बिल मान्य करुन घेतलं आणि राज्यपालांना ते पाठवले आहे. यावर राज्यपालांनी सही केली तर ओबीसी समाजाला न्याय मिळेल असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात ओबीसींना दिलासा मिळू शकतो

ओबीसींसाठी सर्वोच्च न्यायालयातील ८ फेब्रुवारीला होणारी सुनावणी फार महत्त्वाची आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचीसुद्धा ४ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. राज्य मागासवर्ग आयोग सकारात्मक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसींना दिलासा मिळू शकतो असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंह यांची एसीबीकडून चौकशी, अनुप डांगेंनी केला होता आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -