घरक्राइमअबब ! सेक्स स्टॅमिना वाढवण्याच्या नादात वृद्धाने गमावले ७ लाख

अबब ! सेक्स स्टॅमिना वाढवण्याच्या नादात वृद्धाने गमावले ७ लाख

Subscribe

वेगवेगळे उपाय करुन सेक्स स्टॅमिना वाढवण्याच्या नादात तरुणाई स्वत:चे आयुष्य उद्ध्वस्त करत असल्याच्या घटना उघडकीस येत असताना आता नाशिकमधील ६७ वर्षीय वृद्धाने सेक्स स्टॅमिना वाढवण्याच्या नादात तब्बल ६ लाख ९० हजार रुपये गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात आयुर्वेद तज्ञ दोन वर्षांपासून नग्न फोटोंमार्फत धमकावून लाखो रुपये उकळत असल्याने वृद्धाने नाशिक शहर पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. त्यानुसार सायबर पोलिसांनी संशयित विक्रम ठाकूर, बाबा दयानंद व राजकुमार गव्हाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकमधील तपोवनात ४ सप्टेंबर २०१९ रोजी संंबंधित वृद्धाची अनोळखी व्यक्तीशी भेट झाली. त्याने आयुर्वेद तज्ञ असल्याने भासवले. विश्वास संपादन होताच वृद्धाने सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी औषधांची मागणी केली. ही संधी साधून अनोळखी व्यक्तीने वृद्धाशी ओळख वाढवण्याचे प्रयत्न केले. यातून ४ सप्टेंबर ते डिसेंबर २०२१ दरम्यान नासर्डी पुलाजवळ, जयशंकर गार्डन तसेच तपोवन या ठिकाणी वृद्धाच्या भेटी घेतल्या. तपोवनात भेटीप्रसंगी आयुर्वेद तज्ञाने सेक्स स्टॅमिना वाढविण्याच्या बहाण्याने अर्धनग्न फोटो मोबाईलमध्ये काढून घेत वृद्धाकडून औषधांसाठी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर वैद्याने सेक्स स्टॅमिना वाढण्यासाठी आणि मुले होण्यासाठी आयुर्वेदिक उपचार करत असल्याचे भासवून उपचारासाठी वृद्धाचे पुन्हा नग्न फोटो घेतले. यानंतर वैद्याने वृद्धाच्या घरी कुरिअरमार्फत फोटो पाठवत औषधांसाठी आणखीन पैसे न दिल्यास नग्न फोटोंचे पॅम्पलेट बनवून वाटण्याची धमकी दिली. समाजात बदनामी होवू नये, या भितीपोटी वृद्धाने वैद्याच्या पंजाब नॅशनल बँक व स्टेट बँक ऑफ इंडियातील बँक खात्यांवर एकूण ६ लाख ९० हजार रुपये जमा केले. तरीही, वैद्याकडून वृद्धाला त्रास देणे सुरु होते. वैद्याचा त्रास असह्य झाल्याने वृद्धाने बुधवारी (दि.२२) नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली करत आहेत.

- Advertisement -

कायमचे फोटो डिलीटसाठी २ लाखांची मागणी

संशयित आयुर्वेद तज्ञ वृद्धाशी पाच मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे.
वैद्याने २३ ऑक्टोबर २०२१ रोजी वृद्धाचे व्हॉट्सअ‍ॅपवरुन घेतलेले नग्न अवस्थेतील फोटोंची छपाई करुन पॅम्प्लेट प्रसारीत केले. शिवाय, वैद्याने नग्न फोटो कायमस्वरुपी डिलिट करण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी वृद्धाकडे केल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -