घरमहाराष्ट्रपुणेपुण्यात पुन्हा खळबळ, वृद्ध महिलेने दिली आंतरराष्ट्रीय विमानतळ उडविण्याची धमकी

पुण्यात पुन्हा खळबळ, वृद्ध महिलेने दिली आंतरराष्ट्रीय विमानतळ उडविण्याची धमकी

Subscribe

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका वृद्ध महिलेने ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune Airport Bomb Threat : पुण्यात महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत चार अतिरेक्यांना ताब्यात घेतले. या चौघांकडून विविध गोष्टींचा उलगडा करण्यात येत असल्याने सुरक्षा यंत्रणा चांगल्याच सतर्क झालेल्या आहेत. महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतलेल्या चौघांची कसून चौकशी करण्यात येत असतानाच आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका वृद्ध महिलेने ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेचे नाव नीता प्रकाश कृपलानी असून तिचे वय 72 असल्याचे सांगण्यात येत आहे. (Old woman threatened to blow up Pune International Airport )

हेही वाचा – 15 ऑगस्टला दहशतवाद्यांकडून घातपाताचा कट, महाराष्ट्र ATSकडून कसून चौकशी

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी आरोपी वृद्ध महिला नीता कृपलानी ही पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. पण यावेळी सुरक्षारक्षक महिला ज्यावेळी या महिलेची तपासणी करू लागली तेव्हा या महिलेने तिच्या शरीराला बॉम्ब लावले असल्याचे सांगितले. विमानतळावर आत जाण्यापूर्वी सुरू असलेल्या चौकशीला वेळ लागत असल्याने या महिलेकडून अशी बतावणी करण्यात आली. ही महिला पुणे-दिल्ली या विमानाने प्रवास करणार होती, अशी माहिती समोर आली आहे.

परंतु, यानंतर या महिलेला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेत तिची चौकशी सुरू केली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी दिपाली झावरे यांनी फिर्याद दिली. ज्यानंतर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण, या महिलेने केलेला दावा ही केवळ अफवा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या महिलेने तिच्या शरीराला बॉम्ब लागले असल्याची बतावणी केल्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. विमानतळ पोलिसांनी आरोपी महिलेला नोटीस जारी केली असून योग्य उत्तर न दिल्यास कठोर कारवाई केली जाणार असे सांगितले आहे.

- Advertisement -

तर, महाराष्ट्र ATS आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून येत्या 15 ऑगस्टला घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना असलेल्या अल सुफा आणि आयसिससोबत संबंधित अनेकांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांची बॉम्ब बनवणारी लॅबही असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र ATSने या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली असता येत्या 15 ऑगस्टला देशात दहशतवादी कारवायांचा मोठा प्लॅन असल्याचे उघडकीस आले आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारतासह इस्त्रालय असल्याचं स्प्टष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -