घरमहाराष्ट्र"महापुरुषांच्या अवमानावर उपमुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका व्यक्त केली असती...", अंबादास दानवेंची खंत

“महापुरुषांच्या अवमानावर उपमुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका व्यक्त केली असती…”, अंबादास दानवेंची खंत

Subscribe

मुंबई | “महापुरुषांच्या अवमानावर उपमुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका व्यक्त केली असती तर खूप चांगले झाले असते”, अशी खंत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात व्यक्त केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटाच दिवस आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अंतिम आठवड्याच्या प्रश्नांना आज विधानपरिषदेच्या सभागृहात उत्तर दिले. महापुरुषांच्या अवामान, राज्यातील कायदा सुव्यवस्था, नैना प्रकल्प, सिडको जागा भूसंपादन व आरक्षण मुद्दा, इर्शालवाडी दुर्घटना, तळीये गावाचे पुनर्वसन, नाईट लाईफ, रिक्षा महामंडळ आदी विषयांवर सभागृहात मांडले. पण उपमुख्यंत्र्यांनी त्यावर उत्तर दिले नसल्याने दानवेंनी नाराजी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्र्यांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, “मी ठाण्याच्या एका महिला आमदारांवर अधिकारांच्या कानाखाली मारली तरी त्यांच्या कोणताही कारवाई झालेली नाही. पण आमचे अनिल परब यांच्यावर 353 गुन्हा दाखल होतो. या घटनेपासून आपण दूर जाऊ शकत नाही. महापुरुषांच्या अवामानावर उपमुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका व्यक्त केली असती तर खूप चांगले झाले असते.

- Advertisement -

 

संभाजी भिडे आम्हाला गुरूजी वाटतात

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महापुरुषांचे अपमान केले. यावर राज्यभरातून संभाजी भिडे यांच्यावर टीका होत आहे. या मुद्यांवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनता देखील वक्तव्यावरून विरोधकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विरोधकांनी संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी भिडेंविषयी निवेदन सादर करताना संभाजी भिडे यांचा उल्लेख भिडे गुरूजी असा करताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केला. मात्र, संभाजी भिडे आम्हाला गुरूजी वाटतात, काय अडचण आहे? असे म्हणत देवेंद्र फडणविसांनी विरोधकांना सुनावल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा – संभाजी भिडे आम्हाला गुरूजी वाटतात, काय अडचण आहे? फडणविसांनी विरोधकांना सुनावले

सत्ताधारी आमदार गुन्हेगारांसोबत फिरतात

सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदार ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था तेच खराब करण्याच्या पद्धतीने काम करतात. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण गुन्हेगारांना पकडून आणतो मोका लावलेल्या गुन्हेगारासोबत आमदार फिरतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा असा सवालही दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला.

हेही वाचा – इतिहासात कुठेतरी गुंतवून ठेवायचं आणि…; फडणवीसांच्या ‘गुरुजी’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

‘या’ विषयांवर उत्तर न आल्यामुळे दानवे नाराज

सभागृहात नैना प्रकल्प, सिडको जागा भूसंपादन व आरक्षण मुद्दा, इरसालवाडी दुर्घटना, रायगड येथील तळीये गावाचे पुनर्वसन, नाईट लाईफ, रिक्षा महामंडळ आदी विषयांवर मांडलेल्या भूमिकेबाबत उपमुख्यमंत्र्यांनी कोणतेही उत्तर न दिल्याने दानवेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -