घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023मोदींविरोधात घोषणाबाजी, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावलं; ज्यांच्या नसानसांत...

मोदींविरोधात घोषणाबाजी, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावलं; ज्यांच्या नसानसांत…

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | अधिवेशन सुरू झाल्यापासून अत्यंत संयमी भूमिकेत राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज रागीट रुप पाहायला मिळाले.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शांततेत पार पडत असलेले अधिवेशन शेवटचे काही दिवस वादळी ठरत आहे. राहुल गांधींविरोधात सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला विधिमंडळ परिसरात जोडे मारो आंदोलन झाल्याने विरोधकांनीही सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. यावरून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान कोणीही सहन करणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करारी आवाजात विरोधकांना दम भरला. अधिवेशन सुरू झाल्यापासून अत्यंत संयमी भूमिकेत राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज रागीट रुप पाहायला मिळाले.

हेही वाचा – Breaking : विधिमंडळ आवारात आचारसंहिता, एसओपी तयार करण्याची राहुल नार्वेकरांची घोषणा

- Advertisement -

विधिमंडळ परिसरातील गोंधळ थांबवण्यासाठी एसओपी तयार करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. तसंच, सभागृह आणि आवारातील रेकॉर्ड तपासून घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असंही राहुल नार्वेकर म्हणाले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कारवाई होणार असेल तर कायदा सर्वांना समान हवा. राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन झाले, याला आम्ही समर्थन केलेलं नाही. पंरतु, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही अपमान झाला. त्यामुळे त्याविरोधातही कारवाई व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला आहे, त्यामुळे कारवाई व्हायची असेल तर सर्वांवर समान कारवाई झाली पाहिजे, अशी एकनाथ शिंदे यांनी आग्रही भूमिका मांडली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं देशाचा अपमान आहे. गेले आठ महिने मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून अपमान करणं, खोके, चोर, मिंधे म्हणणं कोणत्या आचारसंहितेत बसतं?” असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. “उपमुख्यमंत्र्यांनीही याबाबत भावना व्यक्त केल्या आहे. सावरकरांचा वारंवार अपमान करणंही देशद्रोह्याचं काम आहे. सभागृहाचं पावित्र्य जपलं पाहिजे. अनेक मोठे नेते या सभागृहाचे सदस्य होऊन गेले आहेत. सभागृहाच्या बाहेरही असं काही होत असेल तर आक्षेप घेतला पाहिजे. या देशाची किर्ती जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम मोदींनी केलं आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांचा अपमान कोणीही सहन करणार नाही. जी २० अध्यक्षपद आपल्याला मिळालं त्याच जी २० मध्ये तुमचे नेते म्हणाले की या देशात लोकशाही नाही, या देशातील लोकशाही धोक्यात आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -


“जर लोकशाही खतरेमध्ये असेल तर भारतजोडो यात्रा कशी काढली. इंदिरा गांधींचा आम्ही मान राखतो. पण तुम्ही आमच्या पंतप्रधानांचा मान ठेवत नसाल तर आम्ही सहन करणार नाही. देशाच्या बाहेर जाऊन देशाचा अपमान करत असाल, सावरकरांचा अपमान करत असाल तर कोण सहन करणार? सगळ्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. विधान भवनात परिसरात आठ महिने घोषणा देत होता. तेव्हा तुम्ही बोलला नाहीत. मोदींच्या आईचं निधन झाल्यावर अंत्यविधीनंतर मोदी लगेच कर्तव्यावर गेले, त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणता? ज्यांच्या नसांनसात देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती भिनली आहे त्यांचा तुम्ही अपमान करता? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -