घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाने पाठवले कांदे

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाने पाठवले कांदे

Subscribe

अहमदनगर : सध्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. शेतकर्‍यांनी जिवापाड जपलेल्या कांद्याचा खर्चही निघणे अवघड झाले आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष बच्चू मोढवे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (६ मार्च) नगर येथील प्रधान डाकघर कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने कांदे पाठवून कांदा निर्यात बंदीचा निषेध नोंदवला.

सध्या शेतकर्‍यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांत असंतोष आहे. दरम्यान, कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने कांदे पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बच्चू मोढवे, शेतकरी विकास मंडळाचे शिवराज कापरे, रमेश चिताळ, धनंजय गायके, शिवाजी निमसे, कुंडलिक चिताळ आदी उपस्थित होते. जागतिक बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या असताना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्याला कांदा मातीमोल भावाने विकण्याची वेळ आली. केंद्र सरकारने निर्यात बंदी हटवून कांद्याला जागतिक बाजारपेठेत वाढलेल्या किमतीचा फायदा शेतकर्‍यांना मिळून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकर्‍यांना प्रतिकिलोला दहा रुपये अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -