घरताज्या घडामोडीविधानसभा अध्यक्षपदासाठी मुंबईच्या आमदाराला संधी, भाजपाचा उमेदवार ठरला

विधानसभा अध्यक्षपदासाठी मुंबईच्या आमदाराला संधी, भाजपाचा उमेदवार ठरला

Subscribe

राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून मुंबईच्या आमदाराला संधी देण्यात येणार आहेत. त्यासाठी भाजपचा उमेदवार ठरला आहे. मुंबईतील कुलाबाचे भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. रविवारी ही निवडणूक पार पडणार आहे. जवळपास १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.

राहुल नार्वेकर हे ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यास ते विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वी एकनाथ शिंदे सरकारची विधानसभेत परीक्षा होईल. याच निवडणुकीतील अर्ज भरण्याची मुदत उद्या(शनिवार)पर्यंत आहे. रविवारी अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.

- Advertisement -

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारने बाजी मारली तर शिंदे सरकारचे विधानसभेतील बहुमत सिद्ध होईल. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव ही औपचारीकता असेल. त्यामुळे शिंदे सरकारची खरी परीक्षा रविवारी होणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदाला असलेले घटनात्मक अधिकार लक्षात घेता शिंदे सरकारकडून त्यासाठी कुणाची निवड केली जाते याची सर्वांना उत्सुकता होती. शिंदे गटातून दीपक केसरकर यांचे नाव चर्चेते होते. परंतु राहुल नार्वेकरांनी उमेदवारी दिली जाणार आहे.

- Advertisement -

भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच विखे हे काँग्रेसमध्ये भाजपच दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार, महाराष्ट्र विधीमंडळाचं ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान, २ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर ३ जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. त्यानंतर ४ जुलै रोजी बहुमत चाचणी पार पडेल.


हेही वाचा : २०१९ला हिंदुत्व मागे पडलं आणि विश्वासघात झाला – चंद्रकांत पाटील


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -