घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरभौतिकशास्त्राने ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना फोडला घाम

भौतिकशास्त्राने ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना फोडला घाम

Subscribe

नाशिक : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नीट २०२२ परीक्षा देताना भौतिकशास्त्रातील भाग एकमधील प्रश्न अवघड गेल्याची प्रतिक्रिया नीट परीक्षार्थींनी नोंदवली.

नाशिकमधील २० परीक्षा केंद्रांवर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेशासाठी इच्छुक सुमारे १० हजार ७०० विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. १७ ) नीट परीक्षा दिली. या परीक्षेसाठी नाशिक व परिसरातून जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९३ ते ९४ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून नीट परीक्षा दिली. यात खासगी शिकवणी करून परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचेच प्रमाण अधिक होते. मात्र, शिकवणी करणार्‍या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राच्या तुलनेत जीवशास्त्रातील भाग दोनमधील प्रश्न सोडविणे अधिक अवघड वाटले. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत अवघड वाटणार्‍या भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रावर लक्ष केंद्रीत अभ्यासात जीवशास्त्र सहज घेतल्याने काही प्रश्न सोडविण्यासाठी अवघड गेल्याची प्रतिक्रियाही काही विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. १७) नीट परीक्षेनंतर बोलताना नोंदवली.

- Advertisement -

आधार कार्डची पडताळणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. काही परीक्षा केंद्रांवर नीटच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली, तर काही परीक्षा केंद्रांवर नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मागील वर्षी नीटसाठी मास्क अनिवार्य असताना यावर्षी केवळ मागणी करणार्‍या विद्यार्थ्यांना मास्क देण्यात आल्याचे दिसून आले.दरम्यान, नाशिक शहरात मागील आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे सोयीचे झाल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

२० मिनिटे अतिरिक्त वेळ

सर्व उमेदवारांना २० मिनिटे अतिरिक्त वेळ दिल्याने यावर्षी विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी एकूण ३ तास २० मिनिटांचा वेळ मिळाला. त्यामुळे विद्यार्थांना विचार करून प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. जीवशास्त्र भाग दोनमधील प्रश्न सोडविण्यासाठी अधिक वेळ लागल्याने वाढीव वेळेचा फायदा झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा साधा पेहराव परीक्षा कक्षात प्रवेश करताना विद्यार्थी फिकट रंगाचे कपडे वापरताना दिसून आले. विद्यार्थ्यांनी अर्ध्या बाह्यांचे शर्ट आणि साधी पँट असा पेहराव करून, तर विद्यार्थिनींनी हाफ शर्ट, साधी पँट, तसेच सलवार, लेगिज, कुर्ती असा पेहराव केला होता. पायात स्लीपर्स परिधान केल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -