घरमहाराष्ट्रमुंबईकरांनो, कृपाकरून घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचे...

मुंबईकरांनो, कृपाकरून घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचे आवाहन

Subscribe

कदाचित गेल्या वर्षी हो गेल्या वर्षीच संघर्ष समिती मला भेटायला आली होती. त्याही वेळी सुभाष देसाई होते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होते. त्यांना आंदोलन करू नका, काळजी करू नका, असे वचन दिले होते. आम्ही हा विषय सोडवल्याशिवाय राहणार नाही. काय काय अडअडचणी होत्या, त्या अडचणी सर्व दूर करून प्रत्यक्ष मुहूर्त आज आपण साधतो आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

मुंबईः जेव्हा आपण हक्काची घरं सरकार असो, महापालिका असो यांच्या माध्यमातून देत असतो. त्यावेळी घर मिळवायला तुम्ही जो संघर्ष केलाय, तो लक्षात ठेवा, हा संघर्ष विसरू नका. अनेक जण हे स्वप्न बघत बघत आपल्यातून निघून गेले, त्यांची आठवण ठेवा. जेव्हा तुम्ही नवीन घरात पाऊल ठेवाल, तेव्हा कृपाकरून हे घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय. मुंबईतील गोरेगावमधील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

पत्राचाळ हा विषय अनेकांना माहीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचं दळण दळलं जातंय. पण प्रश्न काही सुटत नव्हता. अनेकांनी यात आंदोलनं केलीत, हा आजचा क्षण बघायला काही जण हयातही नाहीत. त्यांना सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो. कोरोनाच्या काळात नेमका दिवसच आठवेणासा झालेला आहे. कदाचित गेल्या वर्षी हो गेल्या वर्षीच संघर्ष समिती मला भेटायला आली होती. त्याही वेळी सुभाष देसाई होते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होते. त्यांना आंदोलन करू नका, काळजी करू नका, असे वचन दिले होते. आम्ही हा विषय सोडवल्याशिवाय राहणार नाही. काय काय अडअडचणी होत्या, त्या अडचणी सर्व दूर करून प्रत्यक्ष मुहूर्त आज आपण साधतो आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

सुभाष देसाईंना मी धन्यवाद देतोय, त्यांनी आज अक्षरशः पिच्छा पुरवला होता. ज्या ज्या वेळेला कोणत्याही कामानिमित्त भेटायला यायचे, तेव्हा अहो ते पत्रावाला चाळीचं काय असे विचारायचे. कॅबिनेटमध्येही तोच विषय, असे एक एक जण याच्या पाठी लागले म्हणून आजचा दिवस उजाडला. कामं अनेक असतात, अनेक योजना आहेत, अडचणीसुद्धा डोंगराएवढ्या असू शकतात. एकदा का विषय सोडवायचा म्हटल्यानंतर तो सोडवला जाऊ शकतो. त्याचं हे एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे. मुंबईचं महत्त्व मी काही सांगायला नको. मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, ही सगळ्या मुंबईकरांची इच्छा आहे, असते आणि असायलाच पाहिजे. हा प्रकल्प किती जुना, त्याच्या अडीअडचणी काय याचा पाढा मी काही वाचत बसणार नाही. चिकाटी असली की सर्व काही होतं, असं मी आजच्या शुभ मुहूर्त प्रसंगी सांगेन. जिद्द असली की सर्वकाही होतं. आज आपण सगळे जण ज्या स्वप्नाची वाट पाहतोय, त्या स्वप्नाची आता सुरुवात होतेय. भूमिपूजन होत आहे, लवकरच घरंसुद्धा आपली मिळतील. जेव्हा आपण हक्काची घरं सरकार असो, महापालिका असो यांच्या माध्यमातून आपण देत असतो. घर मिळवायला तुम्ही संघर्ष केलाय, तो लक्षात ठेवा, हा संघर्ष विसरू नका, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.

अनेक जण हे स्वप्न बघत बघत आपल्यातून निघून गेले, त्यांची आठवण ठेवा. जेव्हा तुम्ही नवीन घरात पाऊल ठेवाल, तेव्हा कृपाकरून हे घर विकून मुंबई सोडून जाऊ नका. नाही तर हा संघर्ष सगळा वाया जाईल. ही सगळी मेहनत वाया जाईल आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या. त्याच्यासाठी जिद्दीनं तुम्ही संघर्ष केलात आणि तो संघर्ष जिंकलात. मुंबईत अनेक जण पोटापाण्यासाठी येतात. आपापली घरं जिथे मिळेल तिथे राहतात. पण असं हक्काचं घर मिळाल्यानंतर कृपाकरून ती सोडू नका ही माझी अट आणि विनंतीसुद्धा आहे. यानिमित्तानं ज्यांचं ज्यांचं या योजनेसाठी सहकार्य लाभलं त्यांना धन्यवाद देतो. पत्रावाला चाळीतील सर्व रहिवाशांना त्यांचं नवीन घर आता मिळणार आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. घर झाल्यानंतर आम्हाला निदान आपल्या घरी चहाला तरी बोलवा. बाकी काही नाही, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र, असंही जाता जाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

- Advertisement -

हेही वाचाः st Worker strike : एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर शुक्रवारी सुनावणी, सरकारी वकिलांनी मागितला वेळ

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -