Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सत्ता आमच्याकरता जन्माला आली, गुलाबराव पाटलांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

सत्ता आमच्याकरता जन्माला आली, गुलाबराव पाटलांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

Subscribe

जळगाव – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandreshekhar Bawankule) यांनी आगामी निवडणुकीत भाजपा २४० तर शिंदे ४८ जागा लढवणार असल्याचं म्हणाले होते. यावरून शिंदे गटातील आमदार नाराज झाले असून त्यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. याव आता शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे.

वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत निर्णय होईल. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं म्हणून तसं झालं असं होत नाही. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत आतापासूनच चर्चा करण्याला अर्थ नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

- Advertisement -

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अशा वक्तव्यांमुळे शिवसैनिकांचे मनोबल कमी होत आहे का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. आम्ही सत्तेकरता नव्हे तर सत्ता आमच्याकरता जन्माला आली आहे, असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिले.

बावनकुळे काय म्हणाले होते?

- Advertisement -

भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात जोरदार काम करण्यात येत आहेत. कार्यशाळा, पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहे. मतदारसंघ मजबूत करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. भाजपने २४० जागांवर लढण्याचे नियोजन केले आहे. तर उरलेल्या ४८ जागा शिंदेंकडे जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडे ५० पेक्षा नेते नसल्यामुळे त्यांना अधिक जागा जाणार नाहीत, असं चद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं.

हेही वाचा – शिंदे गटाला विधानसभेच्या ४८ जागा मिळतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वादग्रस्त वक्तव्य

चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटातून नाराजी आली होती. शिंदे गटातील अनेक नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. विरोधकांनीही शिंदे गटाला टार्गेट करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याची चंद्रकांत पाटील यांना सारवासारव करावी लागली. अद्यापही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्याचं ते म्हणाले होते.

हेही वाचा – केंद्र सरकारच्या मेंदूचा केमिकल लोचा, ‘सामना’तून जोरदार टीका

- Advertisment -