घरदेश-विदेशसरकार शिंदे चालवतायत की फडणवीस हा प्रश्न, सध्या चोरांची सत्ता; प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

सरकार शिंदे चालवतायत की फडणवीस हा प्रश्न, सध्या चोरांची सत्ता; प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

Subscribe

आत्ताचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवत आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत आहेत हा मोठा प्रश्न असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जहरी टीका केली आहे. महापुरुषांच्या अवमान केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज विधानभवनावर मोर्चा काढला आहे. यावेळी आंडेबकरांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सध्याचं सरकार हे चोरांचं सरकार आहे. हे सरकार बदलायला हवं म्हणत सरकार हे स्वत:मध्येच गुंतलेले आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आता उपमुख्यमंत्री हा शब्द वापरला नाही तर… 

आंबेडकर पुढे म्हणाले की, पूर्वी आम्ही एक प्रश्नासाठी एकाकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे जायचो आता आम्हाला एक प्रश्न दोन माणसांकडे घेऊन जावा लागतो. यावेळी उपमुख्यमंत्री हा शब्द वापरला नाही तर तुमचं कामही झालं नाही म्हणून समजा असा टोलाही त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे.

- Advertisement -

सध्या सत्ता ही चोरांची सत्ता झाली

दिशा सालियन आणि सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्योरोप पाहायला मिळासे. ज्यावरूनही प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही चोरांच्या पंक्तीमध्ये बसलो आहे, सत्ता ही चोरांची सत्ता झाली आहे. त्यामुळे बदल करा आणि चांगले राज्य आणा, हा संदेश दिल्याबद्दल चंद्रकांत पाटीलांचे जाहीर अभिनंदन करतो, या सरकारचं काही खरं दिसत नाही, दुर्दैव मानतो की, काही व्यक्ती आपल्यातून निघून गेल्या, कशा निघून गेल्या यावरून वाद सुरु आहे, कोणाची नावं घेणार नाही, कारण माणूस शेवटी महत्त्वाचा आहे. पण त्या व्यक्तींच्या नावाने राजकारण सुरु झालं आहे. दुर्दैवाने केंद्र शासन असताना त्यात तपास करत आहे, सीबीआय, आयबी तपास करत आहे, ते केंद्र शासनसुद्धा या दोन व्यक्तींच्या काय खरं काय खोटं सांगायला तयार नाही अशी परिस्थिती आहे.

ते दोन बिचारे आपल्यातून निघून गेले, नैसर्गिकरित्या गेले की अनैसर्गिकरित्या गेले यावर चर्चा सुरु आहे. कुठलंही प्रामाणिक सरकार असेल ज्याला कोणाला थोडीशी माणुसकी शिल्लक असेल त्यांनी डॉक्टरांचा अहवाव काय आहे पोलिसांचा अहवाल काय आहे हा लोकांसमोर मांडला असता. टीव्हीच्या माध्यमातून असं घडलं तसं घडलं , ते घडलं हे घडलं हा मला कळवतो तो मला कळतो अशारितेने तर्क बांधण्याचे काम थांबल असतं, असही आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

माणुसकीहीन सरकार सत्तेवर

पण जिथे माणुसकीहीन सत्तेवर बसले आहेत, ज्यांना माणुसकी महत्त्वाची नाही. ज्यांना माणसाचा जीव महत्त्वाचा नाही, ज्यांना फक्त सत्ता आणि सत्ताच उपयोगी आहे, ज्यांच्याबद्दल अधिक विचार केलेलाच बरा. सत्ता येते जाते, सत्ता मतपेटीतून निर्माण होते आणि ते पाच वर्षांसाठीच होते ती अमरपट्टा नाही. पण त्याला अमरपट्टा करण्याचे कामकाज सुरु आहे. काँग्रेस पूर्वी म्हणायचे की आमच्याशिवाय कुणी राज्य करु शकत नाही. आता भाजप, आरएसएसवाले म्हणून लागले की, आमच्याशिवाय कोणी राज्य करू शकत नाही. त्यावेळी म्हणालो आणि आत्ताही म्हणतो, उद्या गाढव सत्तेवर जरी आला, तरी माजलेल्याला थोबपटणं दिलं तर गत्यंतर नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ज्याला आपण काबुमध्ये ठेवलं पाहिजे तो आता आपल्याला काबुमध्ये ठेवत असल्याची परिस्थिती आहे आणि ही सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात आले तर आपल्याला जमिनीवरून हकलले जाईल, उद्या उरलेल्या ठिकाणाहून हकलेलं जाईल, कोण वाचवणार, असही आंबेडकर म्हणाले.

आम्ही जर रस्त्यावर उचललो तर..

महाराष्ट्र सरकारला आवाहन आहे की, रस्ता आणि आमचं नात गेल्या चाळीस वर्षांपासून आहे, ते नवीन आहे. हा अधिकारी आम्हाला वापरायला लावू नका, आम्ही जर रस्त्यावर उचललो तर तुमची गाडी देखील रस्त्यावरून जाणार आहे, असा इशाराही त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे.


मिटकरींनी पंतप्रधान मोदींबद्दलच ते ट्विट वाचून दाखवलं; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली चांगलीच समज

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -