घरताज्या घडामोडीतुम्ही आम्हाला देशप्रेम शिकवू नका, प्रणिती शिंदेंची संभाजी भिंडेंवर टीका

तुम्ही आम्हाला देशप्रेम शिकवू नका, प्रणिती शिंदेंची संभाजी भिंडेंवर टीका

Subscribe

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी संभाजी भिंडे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. महिलांना वस्तू म्हणून समजणे, त्यांनी काय खावे, कसे वागावे, हे सांगणं म्हणजे महिलांवर प्रतिबंध आणणे. तुम्ही आम्हाला देशप्रेम शिकवू नका, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी संभाजी भिडेंवर केली आहे.

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत प्रणिती शिंदे यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महिलांनी कसे रहावे, कसे वागावे यावर हे बोलणारे कोण आहेत.उलट यांच्या सरकारच्या कार्यकाळात महिलांवर अधिक अत्याचार झाले आहेत. महिलांनी कसे रहावे, कसे वागावे हे आम्हाला शिकवू नका,आमच्या हृदयात देशप्रेम आहे. तुमच्यासारखं केवळ पक्षप्रेम नाही, असे प्राणिती शिंदे म्हणाल्या.

- Advertisement -

काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रे निमित्ताने महाराष्ट्र राज्यात येत आहेत.सोलापुरातील असंख्य कार्यकर्ते हे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतील ,त्याचे नियोजन कसे असेल, याबाबत प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

नेमकं काय झालं?

- Advertisement -

काल 2 नोव्हेंबर रोजी संभाजी भिडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे या संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना थांबविले असता संभाजी भिडेंनी वादग्रस्त विधान करत तिथून काढता पाय घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संभाजी भिडेंची प्रतिक्रया घेण्यासाठी थांबलेल्या महिला पत्रकाराला भिडे म्हणाले, ‘आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो’ असं वक्तव्य करत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकराचा अपमान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


हेही वाचा : Gujarat Election: २०१७ मध्ये सर्वाधिक जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी, मग भाजपाने कशी सत्ता स्थापन केली?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -