घरमहाराष्ट्रनाशिकदेवदूत! रुग्णाचा जीव वाचवण्याकरता गर्भवती डॉक्टरने चालवली रुग्णवाहिका, नाशिकमध्ये तरुणाला जीवदान

देवदूत! रुग्णाचा जीव वाचवण्याकरता गर्भवती डॉक्टरने चालवली रुग्णवाहिका, नाशिकमध्ये तरुणाला जीवदान

Subscribe

नाशिक – नाशिकमध्ये एका तरुणासाठी गर्भवती महिला डॉक्टर देवदूत ठरली आहे. महिला डॉक्टर गर्भवती असतानाही तिने आपले कर्तव्य बजावले. यामुळे तरुणाचे प्राण वाचू शकले आहेत. डॉ.प्रियंका पवार असं या देवदुताचं नाव असून रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी तिने रुग्णवाहिकेचं स्टेअरिंग हाती घेतल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील मांजरगाव येथे २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी उपचारांची गरज होती. प्राथमिक उपचारांसाठी त्याला नजिकच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, त्याची परिस्थिती नाजूक असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात नेणे गरजेचे होते. परंतु, त्याचवेळी रुग्णवाहिकेचा चालक रजेवर असल्याने समस्या निर्माण झाली. इतर कोणतेही खासगी वाहन तिथे उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचावा याकरता महिला डॉक्टराने स्वतःच रुग्णवाहिकेचं स्टेअरिंग हाती घेतलं. ती स्वतः गरोदर असतानाही तिने आपल्या रुग्णसेवेच्या कर्तव्याला प्राधान्य दिलं.

- Advertisement -

आरोग्यसेवक संसारे यांना सोबत घेऊन डॉ.प्रियंका पवार यांनी ग्रामीण रुग्णालय निफाड येथपर्यंत रुग्णवाहिका चालवली. महिला डॉक्टराने दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे तरुणाचा जीव वाचला आहे. त्यामुळे तरुणाच्या कुटुंबीयांसह कर्मचारी, सामान्य नागरिकांकडून वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा – कर्णबधीर तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होणार ‘बेरा’ यंत्र; प्रमाणपत्रासाठी बनाव करणाऱ्यांना बसणार चाप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -