घरमहाराष्ट्रनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मुंबई, पुण्यात आंदोलनं

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मुंबई, पुण्यात आंदोलनं

Subscribe

मुंबईत चर्चगेट स्थानकाबाहेर तर पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलनं केली.

एका बाजुला ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन होत असताना मुंबई आणि पुण्यात या कायद्याच्या समर्थनार्थ सुद्धा आंदोलनं करण्यात आली. मुंबईत चर्चगेट स्थानकाबाहेर तर पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलनं केली.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार…

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार आता भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती धर्माच्या लोकांना भारतात घुसखोर समजले जाणार नाही. या कायद्यानुसार आता त्यांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

- Advertisement -

कायद्याविरोधात राज्यभरात आंदोलनं

दरम्यान आज राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधासाठी हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले. मागचे काही दिवस ईशान्य भारत आणि नवी दिल्लीत कायद्याच्या विरोधात हिंसक आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान आज मुंबईत सामान्यांपासून, सेलिब्रिटींपर्यंत तसेच विविध सामाजिक संघटना यांनी एकत्र येत ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. मुंबईसह नागपूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथेही कायद्याचा विरोध करण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत.

हेही वाचा – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबई, नागपूरमध्ये मोर्चे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -