घरमहाराष्ट्रCoronaVirus: कोरोनाने घेतला अवघ्या १३ महिन्याच्या बाळाचा बळी!

CoronaVirus: कोरोनाने घेतला अवघ्या १३ महिन्याच्या बाळाचा बळी!

Subscribe

पुण्यात सर्वात कमी वयाच्या बाळाच्या मृत्यूची नोंद

जगभरात कोरोना आपले हातपाय पसरवत असताना महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय. अशा परिस्थितीत पुण्यात अवघ्या १३ महिन्याच्या बाळाचा कोरोनाने बळी घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुण्यात आतापर्यंतच्या सर्वांत लहान कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात या १३ महिन्याच्या बाळावर कोरोनाचे उपचार सुरू होते. ही चिमुकली मुलगी अगोदरच कुपोषित असल्याने तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिने सुरू असलेल्या उपचारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि ससून रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यात वारजे परिसरात राहणाऱ्या या चिमुकलीला प्रकृतीच्या काही तक्रारींबरोबर रक्तक्षयाचाही (megaloblastic anaemia with sepsis) आजार असल्याचे सांगण्यात येत आहे. ४ मे पासून या बाळावर उपचार सुरू होते. मात्र कोरोनामुळे रविवारी या चिमुरडीचा जीव गेला.

- Advertisement -

पुण्यात एकूण २ हजार ८५७ रूग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. तर १५६ रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी दिली. दरम्यान रविवारी पुण्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून दिवसभरात १२५ जणांचा COVID-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुण्यात चिंतेचे वातावरण पसरले. यासह रविवारी झालेल्या मृत्यूंमध्ये येरवडा कारागृहातील एका कैद्याचा समावेश आहे.


महाराष्ट्रात १००० हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण; २४ तासांत २२१ नवे रूग्ण!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -