Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र उकाड्याच्या वाढत्या पाऱ्याने पुणेकर हैराण !

उकाड्याच्या वाढत्या पाऱ्याने पुणेकर हैराण !

Related Story

- Advertisement -

राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट दूर होत नाही तोवर नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यातच राज्यात आठवड्याभरापासून वाढणाऱ्या तापमानाने महिन्याभरात सोमवारी उच्चांक गाठला आहे. याचा सर्वाधिक फटका पुणे शहराला बसत आहे. कारण पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. यातच लोहगावमध्ये ४०.१ अंश सेल्सिअस तर पुण्यात (शिवाजीनगर) ३९.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पुण्याच्या तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक असणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. पुण्यात रविवारपासूनच तापमानात वाढ होत आहे. यातच सोमवारी होळीच्या दिवशीही पुण्यात नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. दरम्यान पुण्यात सोमवारी सकाळी गारवा जाणावत होता. मात्र दुपारनंतर मोठ्याप्रमाणात उष्णतेत वाढ झाली. नागरिकांना घराबाहेर पडल्यानंतर तीव्र उनहाचे चटके सहन करावे लागत होते. परिणामी रस्त्यांवरही शुकशुकाट होता. त्यामुळे पुणेकरांनी सायंकाळी घराबाहेर पडणे पसंत केले. सायंकाळनंतर उन्हाची तीव्रता कमी झाल्याने वातावरण थंड झाले होते.

यातच राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा वाढू लागला आहे. मुंबई, कोकण, गोव्यातही सर्वाधित तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ऊन वाढत असल्याने कमाल तापमानही वाढू लागले आहे. त्यामुळे बहुतेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले आहे. यातच राज्यातील ४३.३ अंश सेल्सिअस या सर्वाधिक उच्चांक तापमानाची नोंद ब्रह्मपुरीमध्ये झाली आहे. तर पुण्याच नीचांकी १८ अंश सेल्सियस किमाम तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवसांत पुण्यासह राज्यातील तापमानात वाढ होईल. विदर्भाच्या काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.


हेही वाचा- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन


- Advertisement -

 

- Advertisement -