घरमहाराष्ट्रमनसेची रणनीती ठरणार? राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, कार्यकर्त्यांसाठी मेळावाही घेणार

मनसेची रणनीती ठरणार? राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, कार्यकर्त्यांसाठी मेळावाही घेणार

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे २२ ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर २३ ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात येत्या निवडणुकांची रणनीती ठरतेय का हे पाहावं लागणार आहे.

लीलावती रुग्णालयात राज ठाकरे यांच्यावर २० जून रोजी हिप बोनची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून ते विश्रांती घेत होते. मात्र, आता पुन्हा एकदा ते अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. त्यानुसार, मुंबईत २२ ऑगस्टला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार. तर, २३ तारखेला कार्यकर्त्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी बैठक संपल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते कोणती राजकीय भूमिका जाहीर करतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -