राज ठाकरेंवरील शिराळा कोर्टाचं वॉरंट मुंबई पोलिसांना प्राप्त, वॉरंट रद्द करण्यासाठी राज हजर राहणार का?

राज ठाकरेंच्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेमुळे कल्याणमध्ये २००८ रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये राज ठाकरेंवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. परंतु या अटकेनंतर महाराष्ट्रात मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती

Raj Thackerayr warrant Mumbai police received by Shirala court warrant against Raj Thackeray
MNS Raj Thackeray : भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. शिराळा कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ८ जून रोजी राज ठाकरेंना हजर राहायचे आहे. शिराळा कोर्टाकडून आता हे वॉरंट मुंबई पोलिसांना प्राप्त झालं आहे. राज ठाकरे कोर्टात हजर राहिल्यास त्यांचे वॉरंट रद्द करण्यात येईल अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. राज ठाकरेंविरोधात शिराळा कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. वारंवार कोर्टात गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने वॉरंट जारी केले. (Mumbai police received by Shirala court warrant against Raj Thackeray)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात एका जुन्या प्रकरणात सांगलीच्या शिराळा कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेमुळे कल्याणमध्ये २००८ रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये राज ठाकरेंवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. परंतु या अटकेनंतर महाराष्ट्रात मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. यामध्ये परळी आणि सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सांगलीतील शिराळा कोर्टाकडून राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. राज ठाकरेंना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी हजेरी लावली नाही. सतत गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई करण्यात येत आहे.

शिराळा कोर्टाकडून मुंबई पोलिसांना वॉरंट प्राप्त

शिराळा कोर्टातील राज ठाकरेंविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट मुंबई पोलिसांना प्राप्त झाले असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. तसेच याबाबत राज ठाकरेंना कळवलं असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज ठाकरे वॉरंट रद्द करण्यासाठी स्वतः शिराळा कोर्टात हजर राहू शकतात. अन्यथा मुंबई पोलीस या वॉरंटवरुन कारवाई करेल असे संजय पांडे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंकडे आता दोन पर्याय असल्याचे पांडे म्हणाले. यामुळे राज ठाकरेंना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदाराना भाग पाडले. बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह 10 मनसे कार्यकर्त्याविरोधात आरोपपत्र दाखल।करण्यात आले आहे.


हेही वाचा : राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस