घरताज्या घडामोडीराज ठाकरेचा संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र 

राज ठाकरेचा संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र 

Subscribe

नाशिक : राज ठाकरे शुक्रवार (दि. १९) पासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यातील शनिवार (दि.२०) हा अत्यंत महत्वपूर्ण दिवस ठरला. ठाकरे यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर नाशिक शहरातील तसेच नाशिक लोकसभा मतदार संघातील काही ग्रामीण पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी काही विशेष टिप्स दिल्याचेही समजते. तसेच, ठाकरे यांच्या सोबत उपस्थित असलेल्या राज्यातील नेत्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केल. आज दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे विविध शेतकरी संघटना, आर्किटेक्ट, क्रेडाई सदस्य तसेच मनसेचे ग्रामीण पदाधिकारी यांच्यासोबतही चर्चा करणार आहे.

आता, पक्ष जीवंत दिसेल

राज ठाकरे यांचा नाशिक दौरा असेल तेव्हा मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह संचारतो. मात्र, राज यांची पाठ फिरताच पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ अश्या पद्धतीने संघटनेत निरुत्साह व मरगळ कायम राहते. असाच मागील काही वर्षातला अनुभव आहे. याबाबत राज यांना विचारले असता त्यांनी याच गोष्टींची झाडझाडती घेण्यासाठी मी आलो आहे आणि मी गेल्यानंतरही तुम्हाला पक्ष जीवंत दिसेल असे म्हंटले आहे.

- Advertisement -
‘त्या’ कार्यक्रमाचा पक्षाशी संबंध नाही?

मनसे पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाशी पक्षाचा काही संबंध नाही असे म्हणत पुढे त्यावर भाष्य करणे राज ठाकरे यांनी टाळले. मात्र, त्या कार्यक्रमात नियोजनाच्या अभावामुळे झालेली पत्रकारांना मारहाण याबाबत पक्षाच्या वारिष्ठांची भूमिका नेमकी काय?, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

राज दूत घेणार दर पंधरा दिवसाला आढावा

नाशिक जिल्हा मनसेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. नाशिक मध्ये पूर्वीच्या गतीने आणि सातत्याने काम उभ राहिल्यास भविष्यात यश मिळू शकते असे नेहमीच मनसेच्या वर्तुळात बोलले जाते. त्याच अनुषंगाने संघटना सतत सक्रिय ठेवण्याच्या दृष्टीने दर पंधरा दिवसाने राज ठाकरे यांचा एक विशेष दूत नाशिकमध्ये येऊन येथील कामकाजाचा आढावा घेणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.

- Advertisement -
उपक्रम राबवले जाणार?

मागील काही महिन्यापूर्वी राजपुत्र अमित ठाकरे त्यानंतर स्वत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे करत कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली. त्यानंतर आता त्याचा पुढचा टप्पा म्हणून थेट जनतेशी निगडीत असलेले विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -