घरCORONA UPDATEराज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्तीचा विचार; आरोग्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्तीचा विचार; आरोग्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Subscribe

खाजगी रुग्णालयातील मिळणाऱ्या Precaution डोसबाबत देखील जगजागृती केली जाईल आणि ज्यांना ज्यांना खाजगी रुग्णालयात जाऊन Precaution डोस घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा'' असा आग्रह आरोग्य मंत्र्यांनी नागरिकांना केला.

“राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. पण गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार असून यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील”, असे विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. पंतप्रधान मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना नेमकी कशी आहे यासंदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले की, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मास्कसक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मास्कसक्ती करावी की नाही. यावर चर्चा झाली आहे. राज्यात आज दररोज 25 हजारांपर्यंत कोरोना टेस्टिंग केल्या जात आहे. ही टेस्टिंग संख्या निश्चितपणे वाढली जाईल, महाराष्ट्र कोरोनाचे किरकोळ रुग्ण असून खूप सेफ झोनमध्ये आहे. कोरोनामुळे पॅनिक होण्याची गरज नसून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कारण सध्या 929 कोरोनाच्या अॅटिव्ह केसे आहेत. महाराष्ट्राने एका एका दिवशी 65- 70 हजार केसेस बघितल्या आहेत. पर मिलियनमध्ये कोरोनाच्या अॅटिव्ह केसेसमध्ये महाराष्ट्र खूप खाली आहे. मिझोराम 635, दिल्ली 248, केरळ 82, हरियाणा 73, उत्तराखंड 44, कर्नाटक 28 आहे. परंतु महाराष्ट्रात 7 आहे. देशातील दर 10 लाख केसेसमागे महाराष्ट्रात फक्त 7 केसेस आहेत त्यामुळे काळजीसारखा विषय नाही.”

- Advertisement -

“परंतु पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या आणि कारवाई करा, यासंदर्भात आम्ही सर्वप्रथम टेस्टिंग वाढवू, क्लस्टर भागातील रुग्णसंख्येचे ट्रॅकिंग करू, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचेही ट्रॅकिंग करू, उपचार करु त्याबरोबर पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे जीनोम सिक्वेसिंग करणार आहोत. कारण महाराष्ट्रात केवळ ओमिक्रॉनचं सर्वदूर आहे. याचे सब व्हेरिएंटचं तयार होत आहे. परंतु यातून वेगळा व्हेरिएंट तयार झालेला आहे असा काही भाग नाही. पण जीनोम सिक्वेसिंग करू, ट्रॅकिंग ट्रिट करणार आहोत”, असेही आरोग्य मंत्र्यांनी नमूद केले.

“सर्वात महत्त्वाचा भाग लसीकरणाचा आहे. लसीकरणामध्ये महाराष्ट्र कंट्री एव्हरेजच्या पेक्ष कमी असलेले राज्य आहेत. त्यांच्या बॉर्डर लेव्हलला आहोत. केंद्राच्या सरासरीच्या वेगवेगळ्या वयोगटाच्या इतके नक्कीच आहोत. लसीकरण वाढवणार आहोत. ६ ते १२ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणासाठी आयसीएमआरने परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासमोर एक मोठं काम आहे. ६ ते १२ वयोगटातील लहान मुलाचे लसीकरण करावे लागेल. मात्र हे लसीकरण कसे कराले यासंदर्भातील अधिकृत माहिती अद्याप पाठवलेली नाही. जशी ही माहिती येईल तशी आरोग्य विभागाकडून अमलात आणली जाईल”, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

“त्याबरोबर १२ ते १५ आणि १५ ते १७ वयोगटातील लसीकरणात महाराष्ट्र कंट्री एव्हरेजपेक्षा थो़डे कमी आहोत. त्यासुद्धा पालक आणि शालेय प्रशासनाला विश्वासात घेऊन आपल्याला लसीकरण वाढवाले लागेलचं असा ठराव केला आहे. जूनमध्ये शाळांना सुट्ट्या असल्याने अडचणी आहेत पण तरी सुद्धा लसीकरण वाढवणार” असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

“कोरोना लसीच्या Precaution डोस बाबत जनजागृती करणार आहोत. तसेच ज्या डॉक्टर, नर्स, पॅरामेडट स्टाफ, फ्रन्टलाईन वर्क आणि 60 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचा टक्का वाढवला जाईल. खाजगी रुग्णालयातील मिळणाऱ्या Precaution डोसबाबत देखील जगजागृती केली जाईल आणि ज्यांना ज्यांना खाजगी रुग्णालयात जाऊन Precaution डोस घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा” असा आग्रह आरोग्य मंत्र्यांनी नागरिकांना केला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -