घरमहाराष्ट्रराखी सावंतच्या संसारासाठी रामदास आठवले मैदानात, उद्या करणार आंदोलन

राखी सावंतच्या संसारासाठी रामदास आठवले मैदानात, उद्या करणार आंदोलन

Subscribe

Ramdas Athawale support to Rakhi Sawant | कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, अत्याचार आणि अन्याय होत असल्याची दावा करत याविरोधात आदिल खानवर राखी सावंतने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

Ramdas Athawale support to Rakhi Sawant |मुंबई – आदिल खानने (Adil Khan) फसवले असल्याचा आरोप मॉडेल राखी सावंत (Rakhi sawant) हिने केला आहे. याप्रकरणी राखी सांवतने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. ती रोज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अपडेट्स देत असते. त्यातच, आता या प्रकरणात रिपब्लिकन इंडिया या पक्षानेही उडी घेतली आहे. अभिनेता आदिल खानविरोधात उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) ओशिवरा पोलीस ठाण्यात तीव्र आंदोलन छेडणार आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंतचे आदिल खानसोबत लग्न झाले होते, मात्र लग्नानंतर आदिल खानने अभिनेत्री राखी सावंतवर अत्याचार आणि घोर अन्याय केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

- Advertisement -

मॉडेल राखी सावंत ही रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहेत. तिचे आदिल खानसोबत लग्न झाले होते. काहीच दिवसांपूर्वी तिने याबाबत सोशल मीडियावरून खुलासा केला होता. मात्र, कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, अत्याचार आणि अन्याय होत असल्याची दावा करत याविरोधात आदिल खानवर राखी सावंतने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा – राखी सावंतचा पती आदिलवर इराणी विद्यार्थिनीने केला बलात्काराचा आरोप; एफआयआर दाखल

- Advertisement -

आदिल खानने अत्यंत वाईट वर्तवणूक आणि कृत्य केली असल्याची माहिती राखी सावंतने वेळोवेळी दिली आहे. याविरोधात आदिल खानच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. रिपाइं चे वर्सोवा तालुका अध्यक्ष सुनिल पवार ; जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव;किशोर मासुम ; जयंती गडा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे.

आदिलवर आणखी एक गुन्हा

कर्नाटकातील म्हैसूर येथे एका इराणी महिलेने आदिल खानवर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन आदिलने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेडून करण्यात आला आहे. म्हैसूरच्या व्हीव्ही पुरम पोलीस ठाण्यात आदिलविरुद्ध आयपीसीच्या कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत आणि तिचा पती आदिल यांच्याबाबत वेगवेगळी माहिती प्रसार माध्यमांसमोर येत आहे. नुकतेच राखीच्या आईचे निधन झाले. त्याआधी तिने तिच्या आणि आदिलच्या लग्नाची बातमी फोटोद्वारे सर्वांना दिली. पण त्यावेळी या लग्नाला आदिलकडून नकार देण्यात आला. त्यानंतर राखीच्या या प्रकरणात अभिनेता सलमान खान याने उडी घेत आदिलला समज दिल्याचे बोलले जाते. ज्यामुळे आदिलने सुद्धा या दोघांचे लग्न झाले असल्याचे प्रसार माध्यमांसमोर मान्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -