घरमहाराष्ट्रअशोक चव्हाण पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनण्याची शक्यता; काँग्रेस नेत्याकडूनच मिळाले संकेत

अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनण्याची शक्यता; काँग्रेस नेत्याकडूनच मिळाले संकेत

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे नाना पटोले हे लवकरच प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे.

काँग्रेस पक्षामध्ये असलेले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर अनेकांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर यासाठी देखील नाना पटोले यांना जबाबदार ठरवण्यात आले. त्यामुळे लवकरच नाना पटोले हे प्रदेश अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. असे असताना काँग्रेसचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण? याबाबत देखील चर्चा करण्यात येत आहे. पण पुन्हा एकदा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची वर्णी लागण्याची देखील शक्यता आहे. याबाबतचे संकेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत.

रविवारी (ता. 12 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव तायवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, आमदार अभिजित वंजारी, सुधाकर अडाबळे, माजी मंत्री सुनील केदार तसेच इतर प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनील केदार यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्ष होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमामध्ये बोलताना सुनील केदार म्हणाले की, ‘अशोक चव्हाण मोठ्या मनाचा माणूस आहे. ते आमचा आधारस्तंभ आहेत. आम्ही त्यांना मोठ्या श्रद्धेने पाहत आलो आहोत आणि पाहत राहू. ते कितीही नाही बोलले तरी आम्ही जबरदस्ती करू.’ त्यामुळे अशोक चव्हाण नेमके कोणत्या गोष्टीला नाही बोलत आहेत आणि सुनील केदार यांना त्यांना नेमकी कोणती जबाबदारी द्यायची आहे? यावरून पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि जाणकार नेते असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

हेही वाचा – रविकांत तुपकरांना मोठा दिलासा, अटीशर्थींसह जामीन मंजूर; आंदोलनालाही यश

- Advertisement -

यावेळी सुनील केदार यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याच्या मुद्द्यावरून सुनील केदार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ‘तुम्ही कितीही मोठे झालात, आभाळ गाठलंत, तरी पण थोरातसाहेबांचा आदर जरूर करा,’ असा टोला सुनील केदार यांनी नाना पटोले यांना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -