घरमहाराष्ट्र... तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील, अब्दुल सत्तारांचा सूचक इशारा

… तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील, अब्दुल सत्तारांचा सूचक इशारा

Subscribe

असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असतील तर आम्हालाही त्यांच्यावर असे हल्ले करावे लागतील. एकाकडून मारले जात असेल तर दुसऱ्याकडून बघ्याची भूमिका घेतली जाऊ शकत नाही."

आमच्या आमदारांवर हल्ले होत असतील तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील, असा सूचक इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. मंगळवारी रात्री उदय सामंत यांच्यावर कात्रज येथे हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, या कार्यकर्त्यांना चिथवल्याप्रकरणी हिंगोली शिवसेना संपर्क प्रमुख यांना कोठडीही सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा – पुण्याच्या शिवसेना शहर प्रमुखांसह पाच शिवसैनिकांना अटक, उदय सामंत हल्लाप्रकरणी पोलिसांची कारवाई

- Advertisement -

अब्दुल सत्तार म्हणाले की, “उदय सामंतांवरच्या हल्ल्याचा जितका निषेध करावा, तितका कमी आहे. ही तत्वाची लढाई आहे. ती नश्चित लढावी. पण असा हल्ला करणं चुकीचं आहे. असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असतील तर आम्हालाही त्यांच्यावर असे हल्ले करावे लागतील. एकाकडून मारले जात असेल तर दुसऱ्याकडून बघ्याची भूमिका घेतली जाऊ शकत नाही.”

हेही वाचा – आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नका, उदय सामंतांचा हल्लेखोरांना इशारा

- Advertisement -

तुमच्या मतदारसंघातून बंडखोर आमदार जात असतील तर त्यांच्या गाड्या फोड्या असं वक्तव्य हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी केलं होतं. हे वक्तव्य मी ऐकलं आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच, या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असेल आणि गाडी फोडणाऱ्यांचा उद्धव ठाकरे सत्कार करणार असतील तर त्यांचं या गोष्टीला समर्थन आहे असं समजून त्यांच्यावरही करावाई करावी लागले, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -