घरताज्या घडामोडीबंडखोर आमदारांच्या मुक्कामात वाढ; ३० जूनपर्यंत गुवाहाटीतच राहणार

बंडखोर आमदारांच्या मुक्कामात वाढ; ३० जूनपर्यंत गुवाहाटीतच राहणार

Subscribe

बंडखोर आमदारांचा आजचा साहावा दिवस असून, आणखी काही दिवस हे आमदार गुवाहटीतच मुक्कामाला राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, ३० जूनपर्यंच सर्व आमदार हे रेडिसन्स ब्लू हॉटेलमध्ये राहणार आहेत. शिवसेना नेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार यांनी बंड पुकारला आहे.

बंडखोर आमदारांचा आजचा साहावा दिवस असून, आणखी काही दिवस हे आमदार गुवाहटीतच मुक्कामाला राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, ३० जूनपर्यंच सर्व आमदार हे रेडिसन्स ब्लू हॉटेलमध्ये राहणार आहेत. शिवसेना नेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार यांनी बंड पुकारला आहे. या बंडानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्व आमदारांना परत येण्याची मागणी केली. असलेले प्रस्ताव समोर येऊन मांडण्यास सांगितले. परंतु, आता एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मुक्काम वाढला आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. (rebel MLAs extended stay Shinde group will remain in Guwahati till June 30)

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला भाजपसोबत (BJP) पुन्हा युती करण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील सत्तेसाठी चाचपणी सुरू असल्याचे दिसते आहे. पण, भाजप सावध पवित्रा घेऊन सत्तेची गणिते जुळवत असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे शिंदे गटाला प्रत्येक निर्णय हा विचार करून घ्यावा लागत असल्याचे दिसते आहे. कारण, शिवसेनेत परतीचे दोर आता पूर्णपणे कापले गेले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टिकेवरुन ते स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रिय शिवसैनिकांनो नीट समजून घ्या.मविआचा खेळ ओळखा–एकनाथ शिंदे यांचे टि्वट

या संदर्भात एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शुक्रवारी रात्रीच्या वेळी गुजरातमध्ये शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात भेट झाल्याचे समजते. या बैठकीला अमित शाह हे देखील उपस्थित होते. मात्र, अद्याप या भेटीला आणि बैठकीला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. शिवाय, एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी भाजपाचा काही संबंध नाही, असे वारंवार राज्यातील नेते सांगत आहे. तसेच, बंडाळी पुकारलेले आमदारही आम्ही शिवसेनेतच राहणार असल्याचे म्हणत आहेत.

- Advertisement -

त्यामुळे आता एकिकडे उद्धव ठाकरे आमदारांना परत या आणि चर्चा करण्याच्या सुचना देत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने आपला मुक्काम वाढवला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – शिवसेनेला मोठा धक्का, नरेश म्हस्के यांचा राजीनामा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -